Headlines

तुळजापुरात आश्विन पौर्णिमेला 3 लाख भाविक नतमस्तक:आज 5लाखांचा अंदाज, आई तुळजाभवानीची श्रमनिद्रा संपणार; दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी



तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आश्विन पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी तब्बल ३ लाख भाविकांनी हजेरी लावली. सोमवारी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असून ५ लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गतवर्षी याच दिवशी च

.

नवरात्र महोत्सवानंतर तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची आश्विनी पौर्णिमा यात्रा भरली आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांचे लोंढे तुळजापुरात दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांसह रविवारी दुपारनंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतील भाविकांचीही मोठी उपस्थिती दिसून आली. सोमवारी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार आहे. मातेची श्रमनिद्रा संपल्यानंतर तिचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी रविवारी तीन लाख भाविक तुळजापुरात दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

नवरात्रामध्ये अनेकांचे दर्शन

गतवर्षी नवरात्र महोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक भाविकांना तुळजापूर येथे दर्शनासाठी येता आले नव्हते. अनेक ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीने थैमान घातले होते. त्यामुळे गतवर्षी नवरात्रात अपेक्षित गर्दी दिसून आली नव्हती. त्यानंतर आश्विन पौर्णिमेला मात्र मोठी गर्दी झाली होती. यंदा पावसाचे प्रमाण नसल्यामुळे अनेक भाविकांनी नवरात्र महोत्सवातच तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. याचा परिणाम आश्विन पौर्णिमेच्या यात्रेतील गर्दीवर होण्याची शक्यता आहे. त्यातच पौर्णिमेचे दोन दिवस संपल्यानंतर लगेच मंगळवार येत असल्याने काही भाविक मंगळवारचा योग साधण्यासाठी पौर्णिमेला दर्शनासाठी येणे टाळतात.

आज मोठ्या गर्दीची शक्यता

रविवारी भाविकांना पलंगावर निद्रावस्थेत असलेल्या देवीचे दर्शन घ्यावे लागले. सोमवारी मात्र, सिंहासनावर प्रतिष्ठापित देवीचे दर्शन मिळेल. सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर मातेचे हे तेजःपुंज रूप आणि भक्तिमय वातावरण डोळ्यात साठवण्यासाठी मंदिरात अलोट गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

तुळजापुरात सर्व महत्त्वाचे धार्मिक विधी आज होणार

कोजागरी पौर्णिमेनिमित्त रविवारीच बहुतांश भाविक तुळजापुरात दाखल झाले असून शहरात लाखोंची गर्दी झाली आहे. मात्र, यात्रेतील सर्व महत्त्वाचे धार्मिक विधी सोमवारी होणार आहेत. सोमवारी सोलापूरच्या शिवलाल तेली समाजाच्या काठीचे आगमन होणार आहे. तसेच काठ्यांसह रात्री मंदिरात छबिना काढला जाणार आहे. यासोबतच प्रमुख महंतांच्या जोगव्याने आश्विन पौर्णिमा यात्रेची सांगता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *