Headlines

‘थांब, तुझा गेमच करतो’ म्हणत तरुणावर गोळीबार:नाशिक शहरातील उपनगरात आंबेडकर जयंती मिरवणुकीत प्रकार; तरुण बचावला




नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थांब, तुझा गेमच करतो’ अशी धमकी देत दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘तुझा गेमच करतो’ अशी उघड धमकी देत दहशत माजवणाऱ्या संशयितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल रण्यात आले असून, पोलिस आता त्यांच्या शोधात आहेत. आगार टाकळी येथील रहिवासी सिद्धार्थ प्रकाश पगारे (26) हे 14 एप्रिलच्या रात्री मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री 11:30 च्या सुमारास डीजेच्या तालावर नाचताना गर्दीत अक्षय लोखंडे याला त्यांचा किरकोळ धक्का लागला. या शुल्लक कारणावरून संतापलेल्या अक्षयने सिद्धार्थ यांना जातीवाचक शिवीगाळ करीत ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. काही वेळातच अक्षय लोखंडे हा त्याच्या एका साथीदारासह दुचाकीवरून टाकळीगाव येथील आंबेडकर पुतळ्याजवळ आला. त्याने सिद्धार्थ यांना अडवून थेट खिशातून पिस्तूल काढले आणि त्यांच्या दिशेने रोखून “थांब, तुझा गेमच करतो” अशी गर्दीत ओरडून धमकी दिली. संशयिताने पिस्तुलाचा घोडा दाबला. सुदैवाने गोळी झाडली गेली नाही. त्याचवेळी सिद्धार्थ यांनी प्रसंगावधान राखून खाली वाकत स्वत:चा बचाव केला. यावेळी संशयिताच्या साथीदारानेही धारदार शस्त्राचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. काही महिन्यांपूर्वीच उपनगर परिसरात धारदार शस्त्रांनी जाधव बंधूंवर वार करत हत्या करण्यात आली होती. त्याची चर्चा अजूनही परिसरात आहे. त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरलेली असते. मात्र, पोलिस गस्त कमी पडत असल्याने गुंडांचे फावते, अशी तक्रार नागरिक करत आहेत. संशयित फरार; परिसरात तणावाचे वातावरण या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर सिद्धार्थ यांनी थेट उपनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या या गुंडांना तातडीने अटक करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *