Headlines

दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याला 7,171 रुपयांचा भाव:उमराणे बाजार समितीत कांदा, मका, सोयाबीन लिलावाचा शुभारंभ; मक्याला 3,001 रु. प्रतिक्विंटल दर‎


.

येथील स्व. निवृत्तिकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांदा, मका व सोयाबीनच्या लिलावाचा शुभारंभ झाला. नवीन लाल कांद्याला ७,१७१ रुपये प्रतिक्विंटलचा मुहूर्ताचा भाव मिळाला, तर कांद्याचा उच्चांकी दर ९,५०० रुपये नोंदविण्यात आला. मक्याला ३,००१ रुपये, तर सोयाबीनला ७,१७१ रुपये प्रतिक्विंटल मुहूर्ताचा भाव मिळाला. कांदा व्यापारी आकाश शिंदे यांनी गिरणारे येथील शेतकरी बापू भीमा खैरनार यांचा कांदा ७,१७१ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला. सभापती विलास देवरे यांच्या हस्ते खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.

मक्याला खारीपाडा येथील शेतकरी रमेश उत्तम जाधव यांच्या मालासाठी ३,००१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मक्याचा किमान दर २,२५०, तर सरासरी दर २,६०० रुपये होता. चिंचवे येथील शेतकरी विश्वास तुळशीराम वाघ यांच्या सोयाबीनला ७,१७१ रुपये प्रतिक्विंटलचा मुहूर्ताचा भाव मिळाला. यावेळी उपसभापती दादाजी खैरनार, संचालक प्रवीण देवरे, सुनील देवरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना, संजय देवरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव तुषार गायकवाड यांनी केले, तर कांदा व्यापारी सुनील देवरे यांनी आभार मानले.

कडक उन्हामुळे कांदा वाढीस लागला साडेतीन महिने वेळ गिरणारे येथील शेतकरी बापू भीमा खैरनार यांनी सांगितले की, जून महिन्यातील पहिल्या पावसानंतर एक एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांतील कडक उन्हामुळे कांद्याच्या वाढीस साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिल्याच बैलगाडीतील कांद्याला चांगला भाव मिळाल्याने आनंद झाला.

^यंदा कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी जिद्दीने नवीन लाल कांद्याचे पीक घेतले. त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, यासाठी बाजार समिती योग्य व न्याय्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. – विलास देवरे, सभापती, बाजार समिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *