Headlines

खुल्लोड सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब वाघ:तर व्हाइस चेअरमनपदी नारायण मोकासरे विराजमान




खुल्लोड, (ता.सिल्लोड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब माणिकराव वाघ, तर व्हाइस चेअरमनपदी नारायण पांडुरंग मोकासरे यांची सोमवार दि. १९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थ व सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या आगामी वाटचालीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद सावित्रे, सहकार अधिकारी देवकर आणि संस्थेचे सचिव संजय बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नूतन संचालक मंडळात बाळासाहेब उत्तमराव वाघ, द्वारकाबाई वाघ, यमुनाबाई भोरकडे, रघुनाथ नागरे, रमेश वाघ, गजानन सन्नासे, आसाराम वाघ, भगवान भागवत, अलकाबाई वाघ, शेवंताबाई वाघ, सिद्धार्थ सुरडकर, काभुराव निकम आणि विष्णू कोठाळे यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचे शासकीय कंत्राटदार अभय नानासाहेब वाघ, व्यापारी सीताराम वाघ, विष्णू सपकाळ, चंद्रभान हुसे, दशरथ वाघ, छगन वाघ, नारायण दहीकर, राऊबा दहीकर, विजय वाघ, शेषराव दांडगे, विठ्ठल वाघ आणि अंकुश सपकाळ यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *