![]()
एल निनोमुळे यंदा महाराष्ट्रात 8 जून रोजी मान्सून कोकणातील हर्णे व सोलापूरजवळ अडकला होता. 15 जूनपर्यंत राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यानंतर 16 दिवसांनी मान्सूनने पुनरागमन केले. गेल्या 25 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 7 जुलै कालावधीत मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तर मराठवाड्यात 2, 3 जुलैला बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगरात 2, 3 जुलैला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे आहेत. छत्रपती संभाजीनगरात बुधवारी 3 तासांत 38.6 मिमी पाऊस झाला. हा या मोसमातील सर्वाधिक होता. दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील पिंपळगाव खुटे शिवारात वीज कोसळून बिहार राज्यातील लड्डू मनाई मांझी (26) या मजुराचा मृत्यू झाला, तर आडगावच्या (ता. जिंतूर) मंगलबाई खंडागळे या महिलेचा मृतदेह औंढा तालुक्यात घटनास्थळापासून 6 किलोमीटर अंतरावर आढळला. मराठवाड्याचा समावेश नाही 2 जुलैला पालघर व 3, 5 जुलैला रायगड, 5 जुलैला ठाणे, 5 जुलै सातारा, पुणे 2, 3, 5 जुलैला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीला 2 ते 5 जुलै ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कशामुळे पाऊस
बंगालजवळ चक्रीय वारे गेल्या काही दिवसांपासून अडकलेला नैऋत्य मोसमी पाऊस वेगाने पुढे सरकला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली. यामुळे महाराष्ट्रात पाऊस होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पिकांच्या वाढीसाठी कमी काळ मिळाला, उत्पादनावर परिणाम होऊ शकतो जून महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे मूग, उडीद या पिकांचा हंगाम हातातून गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामळे त्याऐवजी बाजरी, सूर्यफूल किंवा चारा पिकांकडे शेतकरी वळतील. पेरण्या लांबल्याने पिकांच्या वाढीसाठी कमी कालावधी मिळतो. त्यामुळे उत्पादनावर नक्कीच परिणाम होऊ शकतो. उत्पादन घटू शकते. म्हणून जास्त कालावधीत येणारी कपाशी तसेच सोयाबीनचे वाण शेतकऱ्यांनी टाळावे. बी. पी. लोंढे, निवृत्त कृषी अधिकारी नाशिकला पावसात डोक्यावर इरलं घेऊन वारकरी मार्गस्थ नाशिक | त्र्यंबकेश्वरहून 29 जूनला निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी वारकरी व दिंड्यांसह बुधवारी पंढरपूरकडे रवाना झाली. तेव्हा बुधवारी दुपारनंतर हलका पाऊस आल्याने डोक्यावर इरलं घेऊन हे वारकरी पावसापासून बचाव करत मार्गस्थ झाले.
Source link
दिलासा:संभाजीनगरला आज-उद्या सलग 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट, 16 दिवसांनी राज्यात मान्सून परतला, पेरण्या मार्गी लागू शकतात