.

शहरात दिवसाला जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी १५० अर्ज मनपा मुख्यालयात सादर केले जात असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून (डीएचओ) केवळ ७० दाखलेच एका दिवसात मंजूर होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजारांवर दाखले प्रलंबित आहेत. परिणामी दाखले मिळण्याच्या संथगतीमुळे विद्यार्थी, पालक, सर्वसामान्यांची शैक्षणिक व इतर आवश्यक कामे खोळंबली आहेत. ते मनपा प्रशासनासह शासनाविरोधात सातत्याने संताप व्यक्त करीत आहेत. मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांवर नागरिकांचा दबाव वाढला आहे. त्यांनी जास्तीत जास्त दाखल्यांना मंजुरी मिळावी यासाठी शासन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तरीही अद्याप यश आलेले नाही.
दहावी, बारावीचे निकाल लागले आहेत. विद्यार्थ्यांसह पालक व सर्वसामान्यांना प्रवेश, विविध प्रमाणपत्रे तयार करून घेणे, शैक्षणिक तसेच इतर आवश्यक कामांसाठी जन्म-मृत्यूच्या दाखल्यांची आवश्यकता भासत आहे. ज्यांच्याकडे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे नाहीत, अशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दाखले मिळवण्यासाठी मनपा मुख्यालयात दररोज मोठी गर्दी होत उर्वरित,पान.४
दिवसाला ८० दाखले राहत आहेत प्रलंबित जन्म-मृत्यू दाखले मिळवण्यासाठी महानगरपालिकेत १५० अर्ज येतात. कारण डीएचओंकडे एका दिवशी ७० दाखले मंजूर करण्याचीच आयडी आहे. महिनाभरात मनपाकडे ४५०० अर्ज येतात. त्यापैकी २१०० दाखलेच मिळतात. अर्थात दिवसाला ८०, म्हणजे महिन्याला २४०० दाखले प्रलंबित राहतात. प्रलंबित दाखल्यांची संख्या ४८०० वर पोहोचली.
महापौरांच्या नेतृत्वात जि.प. सीईओंची पदाधिकाऱ्यांनी भेट २०१६ च्या आधी ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांना जन्माचे प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत. काही उपाययोजना कराव्यात, म्हणून महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या नेतृत्वात उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे, इतर अधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य गांधी यांची भेट घेतली.
बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीचे आदेश महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी जबाबदार असलेले मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा निबंधक तसेच आरोग्य अधिकारी तथा निबंधकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कारण कार्यालयीन चौकशीत या दोघांवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत.