![]()
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरी, अपहार प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, ही घटना म्हणजे श्रीरामचरणी केलेले महापाप आहे. या प्रकरणात चंपत राय, मिश्रांनी हलगर्जीपणा केला. पण या घोटाळ्याला एसीबीआयच (स्टेट बँक ऑफ इंडिया) जबाबदार आहे. पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरे अशी- प्रश्न : चंपत राय यांना राजीनामा का द्यावा लागला? घोटाळ्याला कोण जबाबदार? या चोरीमुळे कोट्यवधी रामभक्तांचा विश्वास तुटला आहे, तुम्हाला याचे दुःख नाही का?
– गोविंदगिरी महाराज : ही घटना म्हणजे श्रीरामचरणी केलेले महापाप, गुन्हा आहे. यामुळे आम्हाला प्रचंड दुःख, वेदना झाल्या आहेत. संपूर्ण देशासमोर शरमेने आमची मान खाली गेली आहे. मी एसआयटीच्या तपास आणि हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पूर्णपणे समाधानी आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. चोरी प्रकरणात चंपत राय यांनी राजीनामा दिला, पण तुम्ही कोषाध्यक्ष असूनही खुर्चीला का चिकटून आहात?
– गोविंदगिरी महाराज : माझ्या राजीनाम्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या, तथ्यहीन आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. संकटकाळी मैदान सोडून पळणे आमच्या रक्तात नाही! या कठीण प्रसंगात ट्रस्टसोबत भक्कमपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. कोषाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी केवळ आलेले धन, जमा-खर्च आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची आहे; रोजच्या पैशांच्या मोजणीशी आणि अपहाराशी माझा पहिल्यापासून थेट संबंध नाही. चंपत राय यांना राजीनामा का द्यावा लागला? त्यांच्यावर काही राजकीय दडपण होते का?
– गोविंदगिरी महाराज : “चंपत राय यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते. त्यांनी स्वेच्छेने आणि स्वतःच्या मर्जीने राजीनामा दिला आहे. त्यांनी दान व्यवस्थापनाची जबाबदारी अनिल मिश्रा यांच्याकडे सोपवली होती. परंतु, त्यांच्या देखरेखीखाली हा हलगर्जीपणा झाला. ज्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. काही माध्यमांमध्ये १४ कोटींची चोरी, घोटाळा झाल्याचा दावा केला जातोय. नेमका आकडा काय?
– गोविंदगिरी महाराज : आमचा प्राथमिक अंदाज आहे की, ही चोरी सुमारे ३ कोटी रुपयांच्या आसपास झाली असावी. सध्या सर्व खात्यांची आणि ऑडिटची पडताळणी व्यवस्थित सुरू आहे. आमच्याकडे दान रूपात जमा झालेल्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत. दान मोजणीची जबाबदारी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची भूमिका संशयास्पद वाटत नाही का?
– गोविंदगिरी महाराज : नक्कीच. दान मोजणी, व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी एसबीआयला सामंजस्य कराराद्वारे दिली होती. तुरुंगात असलेली आरोपी एसबीआयचेच आऊटसोर्स कर्मचारी आहेत. एसबीआयने स्वतःचे इन्स्पेक्टर ठेवून तिथे कडक शिस्त राखायला हवी होती. पण तसे झाले नाही. म्हणून या प्रकरणातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.” उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविषयी काय?
– गोविंदगिरी महाराज : उद्धव ठाकरेंना या निमित्ताने रामरक्षा हा शब्द आठवल्याबद्दल त्यांचे आभार.
Source link
दिव्य मराठी मुलाखत:चंपत राय-मिश्रांनी हलगर्जीपणा केला, मात्र श्रीराम मंदिरातील घोटाळ्यास ‘एसबीआय’च जबाबदार- गोविंदगिरी महाराज