Headlines

दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक, एसी डब्यांच्या काचा फुटल्या:बोरखेडी-सिंधीदरम्यान घटना, गुन्हा दाखल




नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या १२२९० दुरंतो एक्स्प्रेसवर शुक्रवारी रात्री वर्ध्याजवळ बोरखेडी-सिंधीदरम्यान दगडफेक झाली. यात ए-१, बी-२ आणि बी-५ या तीन एसी डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, कोणताही प्रवासी जखमी झाला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. ही घटना २५ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ८.२७ वाजता घडली. बोरखेडी स्थानक ओलांडल्यानंतर काही अंतरावर बाहेरून दगड फेकण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीने शोधमोहीम सुरू केली. या प्रकरणी २६ सप्टेंबर रोजी अज्ञाताविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. देशभरात जुलै ते डिसेंबर २०२५ मध्ये १,६९८ दगडफेकीच्या घटना घडल्या. रेल्वे गस्त व जनजागृती करत असली तरी, धावत्या एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. ———— ही बातमी पण वाचा.. नागपूर-काटोल मार्गावर मातीच्या ढिगाऱ्यावर कार आदळली:घोराडजवळ दोन-तीन वेळा पलटी, वाहनाचा चक्काचूर नागपूर-काटोल चारपदरी मार्गावर घोराड गावाजवळ देवानी फार्म्स परिसरात एका कारचा अपघात झाला. फ्लायओव्हरच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर कार आदळली. यामुळे कार दोन-तीन वेळा पलटी होऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पडली. कारमधील प्रवासी अर्णव कवाडकर यांनी सांगितले की, रात्री ते नागपूर-काटोल मार्गाने जात होते. फ्लायओव्हर सुरू असलेल्या ठिकाणी अचानक मातीचा मोठा ढिगारा दिसला. वाहनचालकाला तो वेळीच लक्षात न आल्याने कार थेट ढिगाऱ्यावर चढली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *