![]()
नागपूर-काटोल चारपदरी मार्गावर घोराड गावाजवळ देवानी फार्म्स परिसरात एका कारचा अपघात झाला. फ्लायओव्हरच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर कार आदळली. यामुळे कार दोन-तीन वेळा पलटी होऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पडली. कारमधील प्रवासी अर्णव कवाडकर यांनी सांगितले की, रात्री ते नागपूर-काटोल मार्गाने जात होते. फ्लायओव्हर सुरू असलेल्या ठिकाणी अचानक मातीचा मोठा ढिगारा दिसला. वाहनचालकाला तो वेळीच लक्षात न आल्याने कार थेट ढिगाऱ्यावर चढली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, तिचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कवाडकर यांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड, सावधानतेचे फलक किंवा रात्री दिसणारे ग्लो साइन नव्हते. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Source link
नागपूर-काटोल मार्गावर मातीच्या ढिगाऱ्यावर कार आदळली:घोराडजवळ दोन-तीन वेळा पलटी, वाहनाचा चक्काचूर