Headlines

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना सरसावली:4 हजार अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन अन् १० लाखांचा धनादेश, 1.60 कोटींची मदत




राज्यात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभियंता संघटना सरसावली असून राज्यातील ४ हजार अभियंत्यांचे एक दिवसांचे वेतन सुमारे १.५० कोटी रुपये तसेच १० लाख रुपयांचा धनादेश असे एकूण १.६० कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात यावर्षी अत्यल्प पावसामुळे प्रचंड दुष्काळ निर्माण झाला आहे. सद्यस्थितीमध्ये सर्व नदी, नाले विहिरी, तलाव कोरडे पडले असून शेता मधील बहुतांशी पिके पावसाच्या ओढीमुळे नष्ट झालेली आहेत. त्यामुळे सण, उत्सवावर दुष्काळाचे सावट निर्माण झाला आहे. राज्यातील जिल्हा परिषद अभियंता संघटना ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना राबवित असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांचा ग्रामीण भागातील नागरिकांशी अत्यंत जवळचा व नित्याचा संबंध आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना धीर देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या सर्व सभासदांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणे व त्याव्यतिरिक्त संघटनेच्या मार्फत वेगळी १० लाख रुपयांची अशी एकूण १.६० कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संघटनेचे राज्याध्यक्ष सचिन चव्हाण, माजी राज्याध्यक्ष सुहास धारासूरकर, कार्याध्यक्ष हेमा कुलकर्णी, महासचिव प्रदिप हुपरे, कोषाध्यक्ष रा.ना. कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे. त्यानुसार राज्यातील चार हजार अभियंत्यांच्या वेतनातून एक दिवसांचे वेतन कपात करण्याचे पत्र देण्यात आले आहे. या शिवाय १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याचे संघटनेचे कोषाध्यक्ष रा. ना. कुलकर्णी यांनी सांगितले. हेही वाचा.. फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर:CM म्हणाले- बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही, व्यथा मांडताना शेतकऱ्यांना कोसळले रडू राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या जाऊ गावात पोहचलेत. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *