![]()
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नसेल. मात्र, कोणत्याही चौकात एका पथकाला 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबता येणार नाही. प्रत्येक मंडळाने मिरवणुकीत दोनपेक्षा जास्त पथके ठेवू नयेत, यावर गणेश मंडळांशी चर्चा करून सहमती झाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अलका चौकात पोहोचलेल्या मंडळांनी पुन्हा विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. मिरवणुकीत टोल, प्रेशर मिड, लेझर लाईट आणि प्लाझ्मा यांवर बंदी घालण्यात आली आहे. आवाजाची ठरवून दिलेली डेसिबल मर्यादा पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. आवाजाची पातळी तपासण्यासाठी ११२ पथके नेमण्यात आली आहेत. उत्सवकाळात ध्वनिप्रदूषणाचे आतापर्यंत २१ गुन्हे दाखल झाले आहेत. गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शहरातील इतर भागांतील तसेच खासगी कॅमेऱ्यांचे फीडही पोलिस यंत्रणेशी जोडण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयातील एकात्मिक नियंत्रण कक्षातून चोवीस तास देखरेख ठेवली जाईल. विसर्जन मार्गावरील चारशेहून अधिक कॅमेऱ्यांचे चित्रण पाहता येणार आहे. गर्दीचे निरीक्षण, वाहतुकीतील अडथळे शोधणे आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी एआय-आधारित व्हिडिओ विश्लेषण, ड्रोन, जीपीएस ट्रॅकिंग आणि मोबाइल नियंत्रण वाहनांचा वापर केला जाईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची मिरवणूक अधिक शिस्तबद्ध होईल, असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. रोहित पवारांच्या आंदोलनास परवानगी नाकारली दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या प्रश्नावर २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एस एम जोशी रस्त्यावर आंदोलनासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. वाहतूक कोंडी, जमावबंदी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पर्यायी आंदोलन करण्याच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. विद्यानंद बापटांचा मुद्दा ऐरणीवर; पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेवर पोलिसांचा दणका: 20 मंडळांवर गुन्हे, 14 डीजे चालक-मालकांवर कारवाई गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळे आणि डीजे चालक-मालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 14 डीजे चालक-मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा वाजवा, पण चौकात 15 मिनिटेच:प्रत्येक मंडळाला दोन पथकांची परवानगी, रोहित पवारांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली