![]()
जिल्ह्यात उजनी १०० टक्के भरल्याच्या समाधानामागे दुष्काळाची भीषण वास्तविकता लपल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड आणि जमिनीतील गायब झालेला ओलावा यामुळे खरीप हंगामातील पिके सुकल्याचे चित्र जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात ठळकपणे समोर आले. महसूल व कृषी यंत्रणेला वातानुकूलित कक्षातून बाहेर काढून थेट बांधावर धाडणाऱ्या प्रशासनाने १२ व १३ सप्टेंबर अशा दोन दिवसांत सर्व ११ तालुक्यांची कसून तपासणी सुरू केली असून, या पाहणीच्या आधारे दुष्काळसदृश परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने शासनाकडे पाठवला जाणार आहे. शनिवारी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दक्षिण सोलापूरमधील बोरामणी, धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोण्हाळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर आणि नाविंदगी या गावांना थेट भेट दिली. बांधावर जाऊन त्यांनी सोयाबीन, मका आणि ऊस पिकांची स्थिती तपासली. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, अवधूत मुळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व धोत्री, तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोन्हाळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर आणि नाविंदगी या गावांच्या शिवाराला भेटी दिल्या. सोयाबीन, मका आणि उसाच्या शेतात उतरून त्यांनी जमिनीची पाहणी केली असता, वरवर हिरवे दिसणारे पीक जमिनीतील ओलावा संपल्याने आतून करपत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पेरणीनंतर शेवटचा पाऊस कधी झाला? पिकांची वाढ कोणत्या टप्प्यावर थांबली? याचा ताळेबंद बोलून मांडला. केवळ शेतीच नव्हे, जनावरांसाठी चाऱ्याची भासणारी टंचाई,पाणीपातळीही त्यांनी पाहिली. शासनाच्या दुष्काळ संहितेनुसार पावसाचे एकूण प्रमाण आणि त्यातील प्रदीर्घ खंड हे दुष्काळ जाहीर करण्याचे प्राथमिक ट्रिगर मानले जातात. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी हे चार तालुके थेट ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ च्या कक्षेत येत आहेत. त्यामुळे या तालुक्यांत दुष्काळी स्थिती असून, प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सूक्ष्म मूल्यांकन करत आहे. ३. अंतिम निष्कर्ष : ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ हे दोन्ही निकष सिद्ध झाल्यानंतरच त्या भागात प्रत्यक्ष मध्यम किंवा गंभीर दुष्काळ घोषित करून सवलती व आर्थिक मदत मंजूर केली जाते. ट्रिगर-२ : ट्रिगर-१ लागू झाल्यानंतर कृषी आणि जमिनीच्या स्थितीची तपासणी केली जाते. यामध्ये चार प्रमुख घटकांचा समावेश होतो. यात पिकांचे पेरणी क्षेत्र, जमिनीतील ओलावा, भूजल पातळीतील घट. पाण्यासाठीची ओढाताण दिसली ट्रिगर-१: हा पावसाच्या प्रमाणाशी संबंधित असतो. हंगामात पडणारा एकूण पाऊस जर सरासरीपेक्षा खूप कमी असेल, अथवा सलग २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा प्रदीर्घ खंड पडला असेल, तर पहिला ट्रिगर लागू होतो. पाच तालुक्यांमध्ये गंभीर स्थिती
Source link
दुष्काळाचे वास्तव:पावसाअभावी जळून गेलेल्या खरीप पिकांसह शेतकऱ्यांचे आश्रूही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले