Headlines

देशात प्रथमच बॅटरीद्वारे 1000 मेगावॅट अवर वीजपुरवठा:महावितरणचा विक्रम, वाढत्या वीज मागणीत नाशिकसह राज्याला दिलासा



सौरऊर्जेची साठवणूक करून सायंकाळच्या उच्चांकी मागणीच्या काळात वीज उपलब्ध करून देण्यात महावितरणने देशात नवा इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत तयार झालेली अतिरिक्त सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून १००० मेगावॅट अवर वीजपुरवठा करण्या

.

यंदा परतीच्या पावसाने ओढ दिल्याने आणि एल निनोच्या प्रभावामुळे ऑक्टोबर हीटच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. उकाड्यामुळे विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. दिवसा सौरऊर्जेमुळे मुबलक वीज उपलब्ध असली तरी सायंकाळी ६ ते १० या वेळेत टंचाई जाणवून महावितरणला खुल्या बाजारातून चढ्या दराने वीज खरेदी करावी लागते. या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या कृषी व औद्योगिक पट्ट्याला फायदा

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसाठी सिंचनाचा हंगाम सुरू झाला असून, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ मुळे शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज मिळत आहे. आता या योजनेतील अतिरिक्त सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून ती सायंकाळी ग्रिडमध्ये सोडली जात असल्याने अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना आणि शहरी भागातील घरगुती ग्राहकांना सायंकाळच्या ‘पिक अवर्स’मध्ये खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही.

मागणीच्या वेळी वीज उपलब्ध होईल, वीज टंचाईवर कायमस्वरूपी उतारा शक्य

राज्यात सौर कृषी वाहिनी योजना २.० ही गेमचेंजर ठरत आहे. दिवसा तयार होणारी अतिरिक्त वीज बॅटरीत साठवून सायंकाळी सर्वाधिक मागणीच्या वेळी उपलब्ध करून दिली जात आहे. बाजारातील चढ्या दरांपासून यामुळे सुटका होणार आहे. आगामी उन्हाळ्यात वाढणाऱ्या वीज तुटवड्यावर ही योजना कायमस्वरूपी उतारा ठरू शकते. – लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव

नाशिकसह राज्यभरात ५० ठिकाणी प्रकल्प

५० ठिकाणी विकेंद्रित प्रकल्प : राज्यात एकूण ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी स्टोरेज प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र व नाशिक विभागातील ग्रामीण व कृषी पट्ट्यांचाही समावेश आहे.

१५०० मेगावॅट अवरचे उद्दिष्ट : महावितरणने एकूण ७५० मेगावॅट क्षमतेचे (२ तासांसाठी प्रत्येकी ७५० मेगावॅट म्हणजेच १५०० मेगावॅट अवर) नियोजन केले असून, त्यापैकी १००० मेगावॅट अवरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५०० मेगावॅट अवरचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल.

४००० मेगावॅट अवरचे पुढील काम सुरू : यानंतर अजुन ४ हजार मेगावॅट अवर क्षमतेच्या महाप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *