Headlines

धीरेंद्र शास्त्रींविरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन:शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याने राजकमल चौकात निदर्शने




हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. रविवार, २६ एप्रिल रोजी राजकमल चौकात हे आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलींद चिमोटे आणि शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही. धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान केला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे काँग्रेसजनांनी म्हटले. महत्वाचे म्हणजे, धीरेंद्र शास्त्री यांनी ज्या कार्यक्रमात हे अवमानजनक वक्तव्य केले, त्या कार्यक्रमाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी भाजप आणि संघाचाही निषेध केला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में काँग्रेस पार्टी मैदान में”, “छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान” अशा घोषणांनी राजकमल चौक दुमदुमून गेला. या आंदोलनात मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, अशोक डोंगरे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री वानखडे, नितीन काळे, निलेश गुहे, संकेत कुलट, विनोद मोदी, हाजी नजीर खान बी.के., नगरसेवक विक्की वानखडे, प्रा. संजय शिरभाते, नगरसेविका अर्चना आत्राम, सुनीता भेले, राजश्री जढाळे, मैथिली पाटील, वंदना निरगुडे, किरण चांदवडकर, सलीमभाई मिरावाले, दीपक हुंडीकर, मनोज भेले, प्रभाकर वाळसे, सुरेश रतावा, विजय वानखडे, जितेंद्र वाघ, अनिल तायडे, गजानन रडके, युवक काँग्रेसचे अनिकेत ढेंगळे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय, इंटक आणि काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *