![]()
सासुरवाडीत झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील संतोष गोविंद चंडोल (२८) या युवकाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे घडली. याप्रकरणी भोकरदन प
.
भोकरदन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष चंडोल हे ४ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नी सोनालीसोबत सासरी सुरंगळी येथे धोंडा जेवणासाठी गेले होते. मात्र, सासरी पोहोचल्यानंतर काही वेळातच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्याने पत्नी सोनाली, मेव्हणा लखन एकनाथ दांडगे, सासू जनाबाई एकनाथ दांडगे आणि चुलत सासरे रमेश सुखदेव दांडगे यांनी संतोष यांना बेदम मारहाण केली. सासरवाडीत झालेल्या मारहाण आणि अपमानामुळे व्यथित झालेल्या संतोष यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी द्रव प्राशन केले.
मृत संतोष यांचे मोठे भाऊ भागवत गोविंद चंडोल यांनी भोकरदन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पत्नी, मेव्हणा, सासू आणि चुलत सासरे अशा चौघांविरुद्ध शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संतोष चंडोल यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री ९ वाजता केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण आणि एक चार वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, मृत संतोष चंडोल यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता.