![]()
राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता थेट रस्त्यावर उतरली आहे. शिवसेना (उबाठा) नेते आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ठाकरे गटाने या आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ही कर्जमाफी नव्हे, तर कर्ज वसुली योजना- दानवे प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वाभाडे काढले. विद्यमान सरकारची ही योजना कर्जमाफी नसून प्रत्यक्षात ‘कर्ज वसुली योजना’ आहे. ठराविक रक्कम भरल्यानंतरच ५० हजार रुपये माफ होतील, अशा अनेक जाचक अटी सरकारने शेतकऱ्यांवर लादल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. मात्र, सध्याच्या सरकारने दिलेले ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अंबादास दानवेंनी ट्विटर एक्सवर केलेली पोस्ट.. मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यांत एल्गार कर्जमुक्तीच्या याच मुद्द्यावर आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर, तर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे. “नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!” ही या आंदोलनाची मुख्य घोषणा असणार आहे. यापूर्वी पक्षाने निदर्शने आणि रास्तारोको सारखी आंदोलने केली होती; मात्र आता शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर थेट रस्त्यावर आणून सरकारला जाग आणली जाईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे ही वाचा.. कॉकरोच जनता पार्टीचा आज नागपुरात एल्गार: जयपूरच्या थप्पड प्रकरणानंतर अभिजीत दिपके मैदानात,
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून ‘कोकरोच जनता पार्टी’ आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आज सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज शहरातील संविधान चौकात दुपारी ४ वाजता हे आंदोलन पार पडणार आहे.सविस्तर वाचा
Source link
नको अटी, नको शर्ती; आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती:अंबादास दानवेंचा सरकारविरोधात एल्गार; आज मराठवाडाभर ट्रॅक्टर मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक