Headlines

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स 2026’ पुरस्कार:पक्षी संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; पर्यावरण दिनी झाले वितरण‎



निसर्ग संवर्धन, पक्ष्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संपूर्ण टीमला प्रतिष्ठेचा ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक

.

गेल्या वर्षभरात अभयारण्य प्रशासनाने पक्ष्यांच्या अधिवास निर्मिती व पुनरुज्जीवनासाठी विविध उपक्रम राबविले. या प्रयत्नांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळाली असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांच्या सक्रिय सहभागामुळे संवर्धन आणि शाश्वत उपजीविकेचा आदर्श निर्माण झाला आहे. या पुरस्कारामुळे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात अभयारण्याने आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. या यशाबद्दल वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांवर पक्षी संवर्धनाबद्दल उत्कृष्ट कार्य केल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पर्यावरण संरक्षणाचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार ^आमच्या कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला हा सन्मान अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. भविष्यातही पक्षी संवर्धन, अधिवास विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करत राहू. – हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी

नांदूरमध्यमेश्वरमधील टीमचे कार्य ठरले प्रेरणादायी ^ जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेला हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमांची आणि निसर्ग संवर्धनासाठीच्या समर्पणाची पोहोचपावती आहे. नांदूरमध्यमेश्वर टीमने केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच प्रकारे संवर्धनाची वाटचाल सुरू राहील. – कृष्णा भवर, उप वनसंरक्षक (वन्यजीव)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *