![]()
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा कोअर क्षेत्रात टी-३९ या चार वर्षांच्या नर वाघाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले. प्राथमिक तपासात वीजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. थाडेझरी बीटमधील बोडुंदा गावाजवळ शेतालगतच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळला. वाघाच्या मृत्यूमागे शिकारीचा प्रयत्न होता की शेतातील वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला धक्का लागला, याचा तपास सुरू आहे. वीजेचा धक्का हे मृत्यूचे संभाव्य कारण मानले जात आहे वनविभागाच्या प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर वीजेच्या धक्क्यामुळे भाजल्याच्या खुणा आढळल्या. घटनास्थळालगतच्या शेतातही विद्युत प्रवाहाशी संबंधित खुणा मिळाल्या. त्यामुळे वीजेचा धक्का हे मृत्यूचे संभाव्य कारण मानले जात आहे. मात्र, अद्याप अंतिम निष्कर्ष निघालेला नाही. पूर्वीच्या नोंदी आणि ओळखचिन्हांनुसार टी-३९ हा कोका येथील मादी वाघिणीच्या पिल्लांपैकी एक असण्याची शक्यता आहे. त्याचे शवविच्छेदन झाले असून, फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. संशयितांची चौकशी सुरू आहे. विद्युत प्रवाहाची व्यवस्था कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली होती, याचाही तपास केला जात आहे. वर्षभरात महाराष्ट्रात २९ वाघांचा मृत्यू* राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) २०२६ मधील नोंदीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात २९ वाघांचा मृत्यू झाला. यात पिल्ले, प्रौढ आणि उपप्रौढ वाघांचा समावेश आहे. पेंच, ताडोबा, नवेगाव-नागझिरा आणि इतर वनक्षेत्रांतील घटनांचीही नोंद आहे. एप्रिलमध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या तिरोडा परिसरात उघड्या विहिरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाला होता. अधिवासाबाहेरील मानवी हस्तक्षेप आणि असुरक्षित शेतशिवार वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा यामुळे पुन्हा समोर आला आहे. एनटीसीएच्या नोंदींमध्ये मृत्यूचे कारण ठरवण्यासाठी शवविच्छेदन, फॉरेन्सिक तपासणी आणि इतर पुरावे तपासले जातात. नागझिरा प्रकरणातही प्रयोगशाळेचा अहवाल आणि तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. ———— हेही वाचा.. एमडी विक्रीसाठी आलेल्या चौघांना अटक: 18.34 ग्रॅम पावडर, कार अन् तीन मोबाइलसह 16.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ एमडी (मेफेड्रॉन) विक्रीसाठी आलेल्या चौघांना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 18.34 ग्रॅम एमडीसदृश पावडर, कार आणि तीन मोबाइल असा एकूण 16 लाख 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त रश्मी राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे गस्ती पथक अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी तैनात होते. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भारत पेट्रोलपंपाजवळील न्यू पंजाबी ढाब्यासमोरील सर्व्हिस रोडवर राखाडी रंगाची एर्टिगा (सीजी 08 डब्ल्यूवाय 5760) संशयास्पदरीत्या उभी होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात चौघे आढळले. सविस्तर वाचा
Source link