![]()
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून सध्या राजकीय वादळ उठले आहे. या पुस्तकात आणीबाणी आणि बाबरी मशीद पतन यांसारख्या मुद्द्यांवर केलेल्या उल्लेखांवरून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर घणाघाती टीका केली आहे. “जेव्हा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, तेव्हा पुस्तके लिहून जनतेत कन्फ्युजन तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे,” असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला. ‘भाजपवर खोटे आरोप करून बातम्यांमध्ये राहण्याची काँग्रेसची सवय’ सोनिया गांधींच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “सोनिया गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यामुळे त्या भाजपबद्दल चांगले कसे लिहितील? हे स्वाभाविक आहे की त्या धादांत खोटेच बोलतील. भाजपने हे केले, मोदीजींनी ते केले, असे खोटे आरोप करून दोन-चार दिवस मीडियामध्ये बातम्या आल्या पाहिजेत, यासाठीच ही पुस्तके लिहिली जातात. स्वतःच्या कर्तृत्वावर काही सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तके लिहून जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचा काँग्रेसचा जुनाच खेळ आहे.” आणीबाणीचे खापर इंदिरा गांधींवर फोडण्यावर टीका पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, आणीबाणीला इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांचा विरोध होता, परंतु संजय गांधी यांच्या दबावामुळे ती लादली गेली. यावर बावनकुळे म्हणाले, “देशाच्या १४० कोटी जनतेला माहिती आहे की, काँग्रेसने आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून देशासोबत सर्वात मोठे पाप केले. व्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा आणि जगण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. तेव्हा लोकांना वाटायचे की इंग्रजांचा आणि मोगलांचा काळ यापेक्षा बरा होता! इतका वाईट निर्णय इंदिरा गांधींनी घेतला आणि आता २०२९ च्या निवडणुकांसाठी ‘तो मी नव्हेच’ असा आव आणत इंदिरा गांधीजींवर दोषारोपण करून काँग्रेस मते मिळवण्याची धडपड करत आहे.” ‘मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी बाबरीचा उल्लेख’ बाबरी मशीद पाडल्यानंतर सोनिया गांधींच्या डोळ्यात पाणी आल्याच्या पुस्तकातील उल्लेखावर बावनकुळे यांनी टीका केली. “बाबरी मशीद पाडल्यानंतर डोळ्यात पाणी आले, असे लिहिणे म्हणजे निव्वळ २०२९ मध्ये मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी केलेले लांगुलचालन आहे. पण आजची जनता हा भूतकाळ बघणार नाही. जनतेला आता फक्त एवढेच हवे आहे की, २०४७ मध्ये विकसित भारत कोण करू शकेल? आणि हे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजीच करू शकतात, हे आता सर्वांना पटले आहे,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. ————— हेही वाचा.. एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमानाला हायजॅकची धमकी:उड्डाणापूर्वी टॉयलेटमध्ये चिठ्ठी सापडली, लिहिले होते- 11.10 वाजता विमान हायजॅक करू
एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमानातील शौचालयात बुधवारी सकाळी अपहरणाची धमकी देणारी एक चिठ्ठी सापडली. त्यात सकाळी ११:१० वाजता विमानाचे अपहरण केले जाईल असे म्हटले होते. वैमानिकाने तात्काळ एटीसीला (ATC) माहिती दिली. त्यानंतर विमान कोलकाता विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये (isolation bay) वळवण्यात आले आणि सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला. सविस्तर वाचा
Source link