![]()
नागपूरच्या आशीर्वाद नगर येथील एका कार डेकोरेटच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली. सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेत दुकानातील सुमारे १० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना २५ मे २०२६ रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. पहाटे ४:४२ वाजता नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळताच, सक्करदरा अग्निशमन केंद्राची दोन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली. अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. दुकान बंद असल्याने आत कोणीही अडकले नव्हते. प्राथमिक तपासानुसार, दुकानातील मुख्य डी. पी. बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीमुळे कार डेकोरेटचे महागडे सामान, कॉम्प्युटर, जुन्या-नवीन गाड्यांचे इंजिन ऑईल, लोखंडी रॅक आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीत दुकानदाराचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत पोहोचून शेजारील सुमारे ५ लाख रुपयांचे साहित्य आणि मालमत्ता सुरक्षित वाचवली. अग्निशमन केंद्राचे अधिकारी शिवाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
Source link
नागपुरात कार डेकोरेटच्या दुकानाला आग:शॉर्ट सर्किटमुळे पहाटे लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक, 10 लाखांचे नुकसान