Headlines

नागपूर ग्रामीण पोलिसांची माणुसकीची दिवाळी:सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गरजू कुटुंबांना मिठाई, कपडे आणि भेटवस्तूंचे वाटप




नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गरजू कुटुंबे, निराधार ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांना मिठाई, नवीन कपडे, भेटवस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भिवापूर पोलिसांनी प्रेमनगरमधील गरजू कुटुंबे आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिठाई व भेटवस्तू दिल्या. मुलांना खाऊ आणि भेटवस्तूंचे वाटप केले. मौदा पोलिसांनी निराधार वृद्ध महिलांना नवीन कपडे, भेटवस्तू आणि मिठाईचे बॉक्स दिले. खापा पोलिसांनी घरकुल परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आणि मुलांना मिठाई दिली. वेलतूर पोलिसांनी जीवनापूरमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्ध नागरिकांना मिठाई आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या. केळवद पोलिसांनी कवठा येथील निराधार आणि दुर्बल नागरिकांना मिठाई व आवश्यक वस्तू दिल्या. अरोली पोलिसांनी पिंपळगावमधील गरजू कुटुंबांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन त्यांच्याशी संवाद साधला. आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद घेऊ न शकणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचणे हा या उपक्रमांचा उद्देश होता. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेसोबतच समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचा संदेश दिला. ——— हेही वाचा.. गडचिरोलीत नक्षलवादमुक्त वातावरणात दिवाळी साजरी: जिल्ह्यातील 70 पोलीस केंद्रांवर नागरिकांसोबत कार्यक्रम; दुर्गम गावांत मिठाई, फटाके आणि फराळाचे वाटप

तीन दशकांच्या दहशतीनंतर गडचिरोलीत यंदा पहिल्यांदाच भयमुक्त वातावरणात दिवाळी साजरी झाली. जिल्ह्यातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांवर नागरिकांसोबत ‘नक्षलमुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली. एकेकाळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गावात कोण येणार, कोण जाणार आणि कोणाशी बोलणार, यावरही नियंत्रण होते. विकासकामांना विरोध, रस्त्यांची जाळपोळ, भूसुरुंग स्फोट आणि पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून आदिवासींच्या हत्या होत होत्या. सरकारी यंत्रणेला गावांपर्यंत पोहोचणेही कठीण होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *