![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर मातृत्व दिनाचे औचित्य साधत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील नागरदेवळे येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिला, गरजू नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करत सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली. या शिबिराचे उद्घाटन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, बुधराणी हॉस्पिटलचे विशाल भिंगारदिवे उपस्थित होते. शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत एकूण २७० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ४७ रुग्णांवर पुणे येथील के. के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. गरजू रुग्णांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, राजेंद्र बोरुडे, ओम बोरुडे, बुधराणी हॉस्पिटलचे सचिन पगार आदींनी परिश्रम घेतले.
Source link
नागरदेवळे येथील शिबिरामध्ये २७० नागरिकांची केली मोफत नेत्रतपासणी:गरजूंना चष्म्यांचे वाटप, रक्तदाब व मधुमेहाचीही केली तपासणी