![]()
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करून प्रसारित केल्याप्रकरणी २३ टिपलाइन आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि संबंधित मोबाइलधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या सुमारे दीड ते पावणेदोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत संशयितांनी लहान बालकांच्या लैंगिक शोषणाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल केले. आंतरराष्ट्रीय सायबर टिपलाइन आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अलर्टच्या आधारे नाशिक सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची छाननी करून हा गुन्हा नोंदवला. ७ वर्षांपर्यंत कैदेची तरतूद १. भा. दं. वि. कलम २९४ (अश्लील साहित्याची विक्री वा प्रदर्शन) – ३ महिने कारावास, दंड. २. आयटी ॲक्ट २०००, कलम ६७ (ब) (लहान मुलांचे लैंगिक चित्रण इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर साठवणे) – पहिल्या वेळी ५ वर्षांपर्यंत कैद व रु. १० लाखांपर्यंत दंड; दुसऱ्या वेळी ७ वर्षांपर्यंत कैद. ३. पोक्सो ॲक्ट २०१२, कलम १५ नुसार ३ वर्षांपर्यंत कारावास, दंड अथवा दोन्ही.
Source link
नाशिकला बाललैंगिक शोषणाचे अडीचशे व्हिडिओ केले व्हायरल:सायबर सेल पोलिस ठाण्यामध्ये 23 संशयितांवर गुन्हे