![]()
केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. ५०० कोटींच्या दारुगोळा करारात लाचखोरी आणि संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती उघड केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी एसएमपीपी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कंसल आणि कुमार यांचा भाऊ बी. हर्षवर्धन यांनाही बेड्या ठोकल्या. अनिल कुमारच्या पुण्यातील घरातून १.७३ कोटी, तर अन्य ३ शहरांतून ५० लाख रोकड, कागदपत्रे जप्त केली. संरक्षण करारासाठी एसएमपीपी कंपनीकडून लाचखोरी या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एसएमपीपी कंपनीला मिळालेला ५०० कोटी रुपयांचा दारूगोळा पुरवठा करार आहे. या करारासाठी खासगी कंत्राटदारांकडून कुमार यांनी लाच मागितली होती.
Source link
पुण्यात एमआयएलच्या कार्यकारी संचालकाकडून 2.23 कोटी जप्त:500 कोटी करारात लाच, सीबीआयकडून तिघांना अटक