![]()
आदिवासी मुलांना आश्रमशाळेत सेंट्रल किचनचे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. मंत्री-संत्र्यांची पोरे फाईव्ह स्टार जेवण जेवतात. मात्र जनावर देखील खाणार नाही असे निकृष्ट जेवण आदिवासी मुलांना दिले जाते. सेंट्रल किचनचे हे जेवण मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व त्यांच्या मुलांना खाऊ घाला, असा जोरदार घणाघात कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी सरकारवर केला. बारा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे ईदगाह मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. दिपके यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी दिपके यांनी अर्धा तास विद्यार्थ्यांशी चर्चा केली व त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. मागील ८० वर्षांत आदिवासींचा विकास झाला नाही. मात्र आदिवासी मंत्री व ठेकेदार यांचे खिसे भरले गेले. पहाटे चार वाजता तयार केलेले सेंट्रल किचनचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जाते. आश्रमशाळेतील स्वच्छतागृहे गलिच्छ असतात. मंत्री-संत्र्यांची पोरे फाईव्ह स्टार जेवण जेवतात, परदेशात शिकायला जातात. तुमच्या मुलांची जशी काळजी घेता, तशी आमच्या मुलांची घ्या. आम्ही काय माणसे नाही का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी शासकीय शाळेत प्रवेशासाठी लाईन लागली या केलेल्या विधानाचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. मी तुमच्यासोबत ५० शाळांत फिरतो, कोणत्या शाळेत लाईन लागली ते मला दाखवा, असे आव्हान दिपके यांनी सरकारला दिले. आंदोलनकर्त्यास भोवळ ॲम्बुलन्स नसल्याने पोलिसांच्या वाहनातून नेले दिपके संवाद साधत असताना सचिन पावरा या आंदोलनकर्त्याला भोवळ आली. त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था नव्हती. पोलिसांच्या वाहनातून त्याला उपचारासाठी नेण्यात आले. आम्ही चांगला सीईओ नेमू
मुख्यमंत्र्यांऐवजी सीईओ नेमा सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला. आश्रमशाळांचे देखील खासगीकरण केले जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांचे व मंत्रालयाचे देखील खासगीकरण करा, मुख्यमंत्र्यांऐवजी चांगला सीईओ नेमू, असा टोला त्यांनी लगावला. उपोषण मागे घ्या, आंदोलन करा उपोषण मागे घ्या, आंदोलन सुरू ठेवा दिपके यांनी या वेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बारा दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे घ्या, आंदोलन सुरू ठेवा, असा सल्ला दिला. तुमच्या जीवाची सरकारला किंमत नाही. नाशिकमध्ये आंदोलन करण्याऐवजी तुम्ही मुंबईला या, आपण तेथे आंदोलन करू, असे सांगितले.
आदिवासी आंदोलनाला दिलेल्या भेटीनंतर नाशिकमध्ये बोलताना सीजेपीचे अभिजित दिपके.
Source link
निकृष्ट जेवणावरून खडे बोल:आदिवासी मंत्र्यांच्या मुलांना आश्रमशाळेचे सडके जेवण खाऊ घाला- अभिजीत दिपके