देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेचा कणा असलेले निमलष्करी दलातील जवान सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत तब्बल ४३८ जवानांनी आत्महत्ये
.
का सुटतेय जवानांची साथ?
जवान नोकरीचा त्यागही करत आहेत. २०१४ पासून २३ हजारांहून अधिक जवानांनी राजीनामा दिला आहे. कठोर ड्युटी, सुट्ट्यांचा अभाव, पदोन्नतीमधील अडथळे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता न येणे ही मुदतपूर्व निवृत्ती घेण्यामागची कारणे आहेत.

तणावाच्या विळख्यात असतात रक्षक
सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये १५७ जवानांनी आत्महत्या केली होती, हे प्रमाण २०२५ मध्ये १३३ पर्यंत खाली आहे. सीआरपीएफ आणि बीएसएफमध्ये प्रमाण अधिक आहे.

तणावामागची कारणे
- मानसिक ताण : सततच्या दहशतवादविरोधी कारवाया आणि उच्च जोखमीच्या ड्युटीमुळे जवानांवर प्रचंड दबाव असतो.
- कौटुंबिक दुरावा : दीर्घकाळ घरापासून दूर राहिल्याने मुलांचे शिक्षण, पालकांचे आजारपण यांसारख्या जबाबदाऱ्या पूर्ण न झाल्याची खंत मनात घर करते.
- नेतृत्वातील त्रुटी : काही वेळा वरिष्ठांकडून होणारा अपमान किंवा तक्रारींचे निवारण न झाल्याने जवानांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होते.
मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती व मानसिक आरोग्य तपासणी अनिवार्य
- समुपदेशन : मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती व मानसिक आरोग्य तपासणी अनिवार्य करणे.
- रजा धोरणात सुधारणा : कौटुंबिक गरजांनुसार वेळेवर रजा मिळण्याची पारदर्शक व्यवस्था हवी.
- संवेदनशील नेतृत्व : कनिष्ठ जवानांशी संवाद वाढवण्यासाठी वरिष्ठांना प्रशिक्षण देणे.
- तक्रार निवारण : जवानांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी अंतर्गत यंत्रणा उभी करणे हे देखील उद्दीष्ट आहे.