![]()
राजधानी दिल्लीत निर्भया प्रकरणासारखी घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा ते कश्मीरी गेटदरम्यान धावत्या स्लीपर बसमध्ये १७ वर्षीय मुलीला लिफ्ट देऊन चालक, वाहकाने तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. यानंतर आरोपी तिला ४० किलोमीटर लांब कश्मीरी गेटजवळ फेकून पसार झाले. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी असून ती ११ वीत शिकते. आईने रागावल्यामुळे ती घर सोडून नोएडातील सेक्टर ६३ मध्ये राहणाऱ्या चुलत भावाच्या घरी निघाली होती. ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौकात उतरली. पुढे जाण्यासाठी वाहन शोधत असताना तिच्यासमोर स्लीपर बस थांबली. बसचालक कुलदीप (३९) व वाहक संदीप (२६) यांनी तिला सेक्टर ६३ मध्ये सोडण्याचा बहाणा करून बसमध्ये घेतले. बावानात बसचालकाचा मुलीवर लैंगिक अत्याचार उत्तर दिल्लीच्या बाहेरील बावाना भागातील एका खासगी शाळेच्या बसचालकावर ३ वर्षांच्या नर्सरीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक केली आहे. १९ ऑगस्ट रोजी मुलीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले की तिच्या गुप्तांगावर जखमांच्या खुणा आहेत, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. चौकशी केल्यावर, मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘बॅड अंकल’बद्दल सांगितले, जो तिला चॉकलेट देत असे.
Source link
निर्भयासारखी घटना:दिल्लीत धावत्या बसमध्ये 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 40 किमी दूर फेकले