Headlines

महाराष्ट्रात 2.7 कोटी नावे वगळली:21%प्रमाण; दिल्ली सर्वाधिक 33%, राज्य निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रारूप यादी जाहीर




विशेष सखोल पुनरीक्षण (एसआआयरआर) मोहिमेत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. राज्यातील २०२४ च्या एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ०४९ मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा (७८.८६%) समावेश प्रारूप यादीत झाला आहे, तर गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ (२१.१४%) मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदींचा समावेश आहे. देशात दिल्लीत १.४५ कोटी मतदारांपैकी ४७.५६ लाख नावे (सर्वाधिक ३३%) वगळली गेली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात २१ % प्रमाण असून ते दुसरे राज्य ठरले आहे. छत्रपती संभाजीनगर आघाडीवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून एकूण २१ लाख ४१ हजार १२९ नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख ७ हजार ६६० नावे वगळली असून सद्य:स्थितीत २६.०८ लाख मतदार यादीत आहेत. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये ३.८८ लाख नावे प्रारूप यादीत आलेली नाहीत. प्रारूपवर आक्षेप घेऊन पुराव्यांसह नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
जिल्हा यादीत मतदार पुरुष महिला वगळलेले मतदार
संभाजीनगर २६,०८,५०७ १३,५२,६८५ १२,५५,७४४ ६,०७,६६०
नाशिक ४०,७६,६६६ २१,०९,००६ १९,६७,५९६ १०,२७,७९२
अहिल्यानगर ३३,८३,१८७ १७,५०,१९९ १६,३२,९०३ ४,२६,९१५
सोलापूर ३३,१८,४२४ १७,०९,४७१ १६,०८,७०९ ६,२२,६७१
जळगाव ३०,३७,४५६ १५,६७,३७५ १४,६९,९९७ ५,१४,७४३
अमरावती २१,९२,३९५ ११,२४,०८३ १०,६८,२५१ ३,५३,२८२
अकोला १३,१८,६५२ ६,८३,४०५ ६,३५,२१५ २,७६,९९२ नावात त्रुटी असल्यास अशी करा दुरुस्ती वगळलेली नावे कारणांसह आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध. ३० सप्टेंबरपर्यंत दावे, हरकती नोंदवता येतील.
प्रपत्र-६ : नवीन नाव नोंदणी (१ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी).
प्रपत्र-७ : बोगस-दुबार नावांवर आक्षेप नोंदवण्यासाठी.
प्रपत्र-८ : यादीतील नाव, पत्ता, वय, इतर दुरुस्तीसाठी.
(टीप: मतदार नोंदणीत खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम ३१ नुसार १ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.) देशभरात ९.९२ कोटी मतदार वगळले देशभरातील एकूण आकडेवारी : एसआयआरमध्ये इतर राज्यांत वगळलेली ७ कोटी ८५ लाख आणि महाराष्ट्रातील २ कोटी ०६ लाख ८८ हजार ४८७ मिळून देशभरात आतापर्यंत सुमारे ९ कोटी ९२ लाख ४४ हजार ४८७ (सुमारे ९.९२ कोटी) मतदारांची नावे वगळली आहेत. दिल्लीत ४७.५६ लाख, पश्चिम बंगालमध्ये वगळलेल्या ५८.२० लाख नावांमध्ये २४.१७ लाख मृत, ३२.६५ लाख स्थलांतरित आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील याचिकेचा अंतिम निकाल बाकी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (२१.१४%) : ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ०४९ पैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ (७८.८६%) मतदार प्रारूप यादीत आहेत. गणना प्रपत्र (Enumeration Form) न मिळाल्यामुळे २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ (२१.१४%) नावे वगळली आहेत. नाशिक जिल्ह्यात १० लाख २७ हजार ७९२ मतदार वगळले ८ महिन्यांनंतर परिणाम सर्वांसमोर येईल : राज्यात येत्या ८ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी, मार्चमध्ये शिक्षक, पद‌वीधर मतदारसंघातील निवडणुका होऊ शकतात. सुप्रीम कोर्टातील याचिकांवर अंतिम निकाल लागल्यास रखडलेल्या जि. प., पंचायत समित्यांच्याही निवडणुका होतील. त्यात परिणाम समोर येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *