Headlines

नीट:देशामध्ये मुलींत प्रथम आलेल्या पुण्याच्या श्रावणीने 2 वर्षे मोबाइलला हात नाही लावला, जि.प. शिक्षक दांपत्याच्या मुलीची झेप




दौंड तालुक्यातील खडकीची श्रावणी कृष्णा कुदळे हिने ‘नीट यूजी-२०२६’ मध्ये ७२० पैकी ७१० गुण मिळवत देशात ५ वा क्रमांक पटकावला आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली, तर महाराष्ट्रासह ओबीसी प्रवर्गात
अव्वल ठरली. यश मिळवण्यासाठी तिने २ वर्षे मोबाइल व सोशल मीडियापासून दुरावा ठेवला आणि मागील १० वर्षे घरात टीव्ही न पाहता कठोर परिश्रम घेतले. श्रावणीचे आई-वडील दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण चोरमले वस्तीवरील (गोपाळवाडी) जि. प. शाळेत, तर पुढील शिक्षण बारामतीमधील माळेगावच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये झाले. नववीपासूनच तिने वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय ठेवले होते. नियमित अभ्यास, संकल्पनांची स्पष्टता आणि प्रश्नपत्रिकांचा सराव ही तिच्या यशाची त्रिसूत्री ठरली. प्रश्नसंच सराव महत्त्वपूर्ण सक्सेस कोड ॲकॅडमीचे डॉ. विराज येळे आणि अण्णासाहेब भुजबळ म्हणाले, “ग्रामीण भागात राहूनही ‘नीट’ची चांगली तयारी होऊ शकते. श्रावणी जिद्दी असल्याने तिने सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत प्रश्नसंचांचा मोठा सराव केला. क्लासनंतर घरीही ती ६ तास प्रामाणिक अभ्यास करत असे.”
ट्राय युवर बेस्ट, वुई आर विथ यु : वडील कृष्णा कुदळे म्हणाले, “मुलांवर ताण न देता घरात अभ्यासाचे पूरक वातावरण द्यावे. श्रावणी रोज १२-१३ तास अभ्यास करायची. शंका दूर करण्यावर तिचा भर होता. घरात ‘लक्ष्य ७२०’ आणि ‘ट्राय युवर बेस्ट, वुई आर विथ यु’ अशी लावलेली फ्रेम तिच्यासाठी प्रेरणादायी ठरली.” निम्मे विद्यार्थी ओबीसी; एससी विद्यार्थी संख्येत ६३% वाढ दिव्य मराठी नेटवर्क|नवी दिल्ली नीटच्या निकालातून वैद्यकीय शिक्षणातील सामाजिक-शैक्षणिक कल बदलत असल्याचे दिसून आले आहे. यंदा परीक्षा देणाऱ्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांचा वर्ग सर्वात मोठा राहिला. एकूण नोंदणीमध्ये ४१.८%, तर पात्रता मिळवणाऱ्यांमध्ये ४५.७% वाटा ओबीसी विद्यार्थ्यांचा राहिला. म्हणजेच जवळपास प्रत्येक दुसरा यशस्वी विद्यार्थी ओबीसी आहे. नोंदणीमध्ये खुल्या वर्गातील विद्यार्थी २९.२% होते, जे पात्रता मिळवणाऱ्यांमध्ये २६% राहिले. एससी वर्गाचा परीक्षेतील सहभाग १५.२% राहिला, तर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तो १४.२% राहिला. ईडब्ल्यूएसची नोंदणी ७.३% होती. पात्रता मिळवणाऱ्यांमध्ये ही संख्या ८.५% झाली. एसटी वर्गातील विद्यार्थ्यांचा नोंदणीतील वाटा ६.६% होता, तर पात्रता मिळवणाऱ्यांमध्ये तो ५.७% राहिला. २०१९ ते २०२६ दरम्यान नीटमध्ये प्रत्येक वर्गाचा सहभाग वाढला आहे. यात ईडब्ल्यूएसची वाढ सर्वात जास्त ७६.३०% राहिली, तर खुल्या वर्गाची सर्वात कमी २४.५२% राहिली. तज्ज्ञांच्या मते, याचे सर्वात मोठे कारण ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. खुल्या वर्गातील अनेक विद्यार्थी आता ईडब्ल्यूएसमधून अर्ज करत आहेत. इंजिनिअरिंग, लॉ आणि मॅनेजमेंटसारख्या इतर करिअर पर्यायांमुळेही खुल्या वर्गातील उमेदवारांची वाढ संथ राहिली.
भाषा: इंग्रजीचे वर्चस्व… हिंदी माध्यम घेणारे ९२% वाढले; तमिळ आणि बंगालीची व्याप्ती वाढली
इंग्रजी हे पसंतीचे माध्यम आहे. २०२६ मध्ये १८.०८ लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून परीक्षा दिली, जी २०१९ पेक्षा ५०% अधिक आहे. पण, २०२५ पेक्षा ०.७६% कमी आहे.
हिंदी माध्यम घेणारे २०१९ मध्ये १.८० लाख होते. २०२६ मध्ये ते ३.४५ लाख झाले. म्हणजेच सुमारे ९२% वाढ झाली.
प्रादेशिक भाषांमध्ये सर्वात वेगवान वाढ तमिळ आणि बंगालीमध्ये झाली. तमिळ माध्यमाचे परीक्षार्थी १,०१७ वरून २९,८४५ (२८३४% वाढ) आणि बंगालीचे ४,७५० वरून ३८,५७७ (७१२% वाढ) झाले.
गुजराती व आसामी माध्यमाचे विद्यार्थी २०२५ च्या तुलनेत घटले आहेत. मराठी आणि ओडियामध्ये २०१९ च्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. मात्र, २०२५ च्या तुलनेत किरकोळ वाढ झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *