Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:20 हजार उधारी फेडण्यासाठी हॅकिंगचे ट्रेनिंग देऊन काढली 25 हजार खोटी जन्म प्रमाणपत्रे




अवघ्या २० हजार रुपयांच्या उधारीपायी महाराष्ट्रात तब्बल २५ हजार बोगस नागरिकांचा जन्म झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत देता येत नसल्याने एका मास्टरमाइंडने आपल्या मित्राला थेट राज्य शासनाचे सीआरएस (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम) पोर्टल हॅक करण्याचे प्रशिक्षण दिले. ठाणे, यवतमाळ, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या ४ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे पोर्टल हॅक करून सुमारे २५ हजार बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये समोर आलेल्या या घटनेत पोलिसानी दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. पोलिसांनी सांगितले की, या बनावट प्रमाणपत्रांचा वापर नवे आधार कार्ड काढणे, जन्मतारीख दुरुस्त करणे, पॅन कार्ड व पासपोर्ट मिळवणे अशा कामांसाठी करण्यात आला. ही प्रमाणपत्रे ₹१०० ते २०० रुपये दराने विकली जात होती. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात या रॅकेटचे जाळे पसरले होते. प्रकरणात ३ आरोपींचा सहभाग समोर आला असून, २ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी अभिषेक फरारच : सूत्रधार उत्तर प्रदेशातील अभिषेक राजेंद्र गुप्ता हा आहे. अभिषेककडे बिहारच्या आदर्शकुमार अशोक दुबेचे २० हजार रुपये थकीत होते. हे पैसे परत करणे शक्य नसल्याने अभिषेकने आदर्शला बनावट प्रमाणपत्रे तयार करण्याची पद्धत शिकवली. यूट्यूबवर हॅकिंगचे व्हिडिओ टाकणाऱ्या अभिषेककडून धडे घेतल्यानंतर, आदर्शने बिहारमध्ये केंद्र सुरू केले व प्रसून प्रेमनारायण कुमावत नावाच्या आणखी एका साथीदाराला सोबत घेतले. अभिषेक अद्याप पसार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *