![]()
कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने या निवडणुकीत बहुमत मिळवले असताना, राज्य सरकारकडून तज्ज्ञ (शासकीय) सदस्यांची नियुक्ती करून गोकुळवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या हस्तक्षेपाला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत, सतेज पाटील यांना भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. ‘हा जनमताचा अनादर आणि विनाशकाले विपरीत बुद्धी’ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “‘गोकुळ’च्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेले जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असंच म्हणावं लागेल. निकालाच्या दिवशी कोल्हापुरात राहून मिरवणूक काढता आली नाही म्हणून तुमचा ईगो दुखावला असेल, तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? सरकारचा हा निर्णय म्हणजे निव्वळ अराजकता आहे.” ‘हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत’ गोकुळचा विषय केवळ बंटी पाटील आणि कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, तर तो लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आज यांनी गोकुळमध्ये रडीचा डाव केला, उद्या लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावरही हे रडीचा डाव खेळतील. त्यामुळे हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला. ‘अध्यक्ष निवडीच्या दिवशी गोकुळला घेराव घाला’ जनतेला आणि कार्यकर्त्यांना थेट संघर्षाचे आवाहन करताना ते म्हणाले, “ज्या दिवशी गोकुळची अध्यक्ष निवड राहील, त्या दिवशी संपूर्ण लोकशाही प्रेमी आणि संविधान प्रेमी नागरिकांनी गोकुळला घेराव घातला पाहिजे. जनमताची ताकद काय असते, हे आपण मुंबईपासून दिल्लीपर्यंत दाखवून द्यायला हवे.” शेवटी, गोकुळचे सभासद आणि बंटी पाटलांसोबत संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे,” असा विश्वास देत रोहित पवार यांनी या लढ्यात महाविकास आघाडी सतेज पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले आहे. ————— हेही वाचा.. ही सरळ सरळ हुकूमशाही: हक्कासाठी जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल, ऊस आंदोलन आणि गोकुळवरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर घणाघात
ऊस आंदोलन आणि कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये सुरू असलेल्या राजकीय हस्तक्षेपावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ती सरळ सरळ हुकूमशाही आणि दादागिरी आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय हे सरकार कोणालाही दाद देणार नाही,” असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला का?:गोकुळ दूध संघावरून रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले- ही तर विनाशकाले विपरीत बुद्धी!