Headlines

नीट गैरप्रकार: सोनम वांगचुक आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठिंबा:गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण, राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी




छत्रपती संभाजीनगर येथे नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आणि पेपरफुटीच्या वाढत्या घटनांविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या २२ दिवसांपासून दिल्लीत या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याचा निषेध करत शहरातील नागरिक आणि परिवर्तनवादी संघटनांनी हे उपोषण केले. उपोषणकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीची जबाबदारी निश्चित करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी ठोस व्यवस्था करावी, असे आवाहन केले. देशातील तरुण पिढीच्या भवितव्याशी संबंधित या संवेदनशील प्रश्नावर केंद्र सरकारची निष्क्रिय भूमिका लोकशाहीसाठी आव्हान असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. सकाळी ९ वाजता या लाक्षणिक उपोषणाची सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास प्रा. विजय पाथ्रीकर आणि प्रा. श्रीराम जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी मिशनचे कुलपती अंकुशराव कदम, युवा पत्रकार निरंजन टकले, खासदार कल्याण काळे, शेतकरी नेते साथी अमर हबीब, कष्टकऱ्यांचे नेते साथी सुभाष लोमटे, प्रा. राम बाहेती, टेलिफोन कर्मचारी संघटनेचे साथी रंजन दाणी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रा. जयदेव डोळे, ॲड. विष्णू ढोबळे, प्रा. मंगल खिंवसरा, प्रा. एच.एम. देसरडा, प्रा. सुभाष महेर, कॉ. भीमराव बनसोड, ॲड. वैशाली डोळस, आवेश भाई, ॲड. अभय टाकसाळ, मेराज सिद्दिकी, प्रा. वैजनाथ राठोड, कॉ. भगवान भोजने आदींनी मार्गदर्शनपर भाषणे दिली. आजच्या लाक्षणिक उपोषणात कृषितज्ज्ञ त्रिंबक पाथ्रीकर, साथी शेख खुर्रम, प्रा. गीता कोल्हटकर, साथी देविदास किर्तीशाही, साथी सर्जेराव जाधव, ॲड. सचिन गंडले, प्रा. प्रकाश शिरसाट, याहया खान सलीम पाशा, रत्नकला राठोड, सुनीता शिंदे, करुणा गंगावणे, वैशाली शिरसाट, तिलोत्तमा झाडे, इंद्रकुमार जेवरीकर, प्रा. ललिता गादगे, कॉ. श्रीकांत फोप्से, सरस्वती हरकळ, शकुंतला देसरडा, प्रा. प्रकाश दाणे, परशुराम वाखुरे, डॉ. मंजुश्री लांडगे, सिद्धार्थ बनसोड, कॉ. भास्कर लहाने, कॉ. मधुकर खिल्लारे यांचा प्रमुख सहभाग होता. या प्रकरणी राष्ट्रपतींनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत लाक्षणिक उपोषणानंतर विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस ॲड. सुभाष सावंगीकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन केले. उपोषणाची सांगता युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि ज्येष्ठ गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांना एक मिनिट स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *