Headlines

नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसवणारे रॅकेट जळगावसह पाच जिल्ह्यात सक्रिय:जळगावात विनापरवाना खतांचा साठा केला होता कृषी विभागाने जप्त



कृषी मित्र पदभरतीच्या नावाखाली महाराष्ट्रभरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाने भंडाफोड केला आहे. नूतन मराठा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने रविवारी धाड टाकून हा

.

नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक यांच्या सूचनेवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे व कृषी अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्या पथकाने नूतन मराठा महाविद्यालयात छापा टाकला. त्यावेळी १११ उमेदवार परीक्षा देताना आढळले. तपासादरम्यान तिथे मोफत वाटपासाठी ठेवलेले क्रॉप बूस्टर चे २५० ग्रॅम वजनाचे २७३ पाकिटे (७ बॉक्स) जप्त केली. या उत्पादक कंपनीकडे कृषी विभागाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बनावट उत्पादने खपवण्याचा प्रयत्न

हे केवळ परीक्षा शुल्क उकळण्याचे रॅकेट नाही, तर यामागे बनावट उत्पादने बाजारात खपवण्याचा मोठा डाव होता. महात्मा फुले कृषी विकास केंद्र (खाजगी), छत्रपती संभाजीनगर आणि हिंदुस्तान ॲग-टेक बायोटेक प्रा. लि., जालना यांनी संगनमत करून हा प्लॅन आखला होता. तरुणांना कृषी मित्र नोकरीचे आमिष दाखवायचे, त्यांच्याकडून प्रत्येकी २५० परीक्षा शुल्क घ्यायचे आणि परीक्षा केंद्रावर आणून त्यांच्या हातात क्रॉप बुस्टरची पाकिटे देऊन त्यांनाच या बनावट खतांचे विक्रेते बनवायचे, असा हा दुहेरी फसवणुकीचा कट होता.

नमुने तपासणीसाठी रवाना

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय किंवा प्रयोगशाळेच्या चाचणीशिवाय अशी जैव उत्पादके किंवा पिकांचे बुस्टर वापरणे शेतीसाठी व जमिनीच्या सुपोषकतेसाठी घातक ठरू शकते. कृषी विभागाने खत नियंत्रण आदेशानुसार या उत्पादनाचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणात जिल्हा समन्वयक राजकुमार जैन यांच्यासह संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची फिर्याद देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *