Headlines

पंढरपुरात गरजू मुलींना सायकली, वह्यांचे वाटप




राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांमधून नेतृत्व घडवणारे नेते होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केल्या. ​स्व. अजित पवार यांच्या निधनाला ५ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या ५ व्या मासिकानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू मुलींना सायकली आणि १ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. यशवंत विद्यालय, पंढरपूर येथे आयोजित या कार्यक्रमाला नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे, युवा नेते प्रणव परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. ​याप्रसंगी बोलताना युवा नेते प्रणव परिचारक म्हणाले, पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लिंक रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, बालकाश्रमात अन्नदान आणि गरजू मुलींना सायकल व वह्यांचे वाटप असे दर महिन्याला वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून दादांना श्रद्धांजली अर्पण करत आहे, तो आदर्श राज्याने घेण्यासारखा आहे. ​या कार्यक्रमास नगरसेवक संजय बंदपट्टे, निखिल परचंडे, गणेश आधटराव, विजय अभंगराव, बाबा चव्हाण, दत्ता भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद, दिलीप कोरके, अमोल परबतराव, सारंग महामुनी, युवराज मुचलंबे, प्रदीप तांदळे, पंकज पवार, विकी अभंगराव, ऋषिकेश रायबान यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *