![]()
वरुड तालुक्यातील रोशनखेडा येथे राहणारे एक दाम्पत्य नदीच्या काठावर गेले असताना अचानक पत्नीचा शेवाळ्यावरून पाय घसरला. त्यामुळे पत्नी नदीत पडली. पत्नी पाण्यात बुडणार असल्याची भीती वाटल्याने तीला वाचविण्यासाठी पतीने नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने पतीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २४ सप्टेंबरला दुपारी घडली. दिलीप ज्ञानेश्वर बोरीवाल (४५, रा. रोशनखेडा) असे मृतकाचे नाव आहे. दिलीप बोरीवाल व त्यांची पत्नी हे दोघेही २४ सप्टेंबरला गावाजवळून वाहणाऱ्या झिरी नदीच्या पात्रात गेले होते. नदीजवळ गेल्यानंतर दिलीप बोरीवाल यांच्या पत्नीचा शेवाळावरून अचानक पाय घसरला आणि ती नदीत पडली. त्यावेळी दिलीप यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात उडी घेतली. मात्र, पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच पाण्यात बुडाले. पत्नी नदीबाहेर आली. मात्र दिलीप कायमचे गेले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी वरुड पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Source link
पत्नीला वाचवताना पती बुडाला:रोशनखेडा येथील झिरी नदीतील घटना: पत्नी सुखरुप