Headlines

पत्रकारांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी:शेवगाव पोलिस ठाण्यात निवेदन




सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची आणि पत्रकार बांधवांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या एका विकृताच्या कृत्याविरोधात शेवगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. सोशलवर एका व्हिडिओ पोस्टखाली पत्रकारांविषयी आक्षेपार्ह, अवमानकारक शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ शेवगाव येथील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्यात पोलिसांना निवेदन देण्यात आले आणि संबंधिताच्या अटकेची मागणी करण्यात आली. शेवगाव येथील एकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओखाली शेवगावचेच एकाने पत्रकारांविषयी अवमानकारक व बदनामीकारक टिप्पणी केल्याचा आरोप पत्रकार संघाने केला आहे. या कमेंटमुळे शेवगावमधील पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांची अशा प्रकारे सोशल मीडियावर जाहीर बदनामी करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचाच अपमान असल्याची संतप्त भावना पत्रकारांनी बोलून दाखवली. पोलिसांना दिलेल्या निवेदनात पत्रकार बांधवांनी भूमिका मांडली आहे. त्यात म्हटले आहे की, संबंधित टिप्पणी करणारा इसम हा कोणीही असो कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. या प्रकरणात कोणताही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी आणि त्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली नाही, तर पुढील काळात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेवगाव पत्रकार बांधवांच्या वतीने देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *