Headlines

पाचोड स्थानकावर शालेय विद्यार्थी एसटी समोर आडवे:बसमध्ये बसण्यास चालकाकडून विद्यार्थ्यांना नकार‎




एसटी महामंडळाच्या बस चालकांकडून शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्याचे नाव घेत नाहीये. पैठण तालुक्यातील पाचोड बस स्थानकावर एका मुजोर इलेक्ट्रिक बस चालकाने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास नकार दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट बससमोर आडवे होऊन तीव्र रोष व्यक्त केला. पाचोड येथे शिक्षणासाठी आलेले ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील करडगाव व झोडेगाव येथील विद्यार्थी रोज या मार्गावरून प्रवास करतात. पैठण डेपोची पैठण–अंबड–जालना इलेक्ट्रिक बस पाचोड स्थानकात आली असता, चालक व वाहकाने करडगाव येथे थांबा नाही असे सांगत विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार दिला. भर पावसात याच वेळी आलेल्या अंबड डेपोच्या दुसऱ्या बसनेही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. प्रवासात होणाऱ्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी बस अडवून धरली. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसफेऱ्या उपलब्ध करून देऊन त्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी कॉग्रेसचे शहराध्यक्ष हसनोद्दीन कट्यारे यांनी केली आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये पास ग्राह्य धरला जात नाही Ãइलेक्ट्रिक बसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवासी पास ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांना या बसमध्ये प्रवास करता येत नाही. विद्यार्थ्यांनी इतर नियमित एसटी बस सेवेचा वापर करावा. – अमर राऊत, आगार प्रमुख पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *