![]()
प्रतिनिधी | पाळधी जीपीएस ग्रुपतर्फे मंगळवारी अत्याधुनिक फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर झाले. सेवा हेच खरे व्रत या भावनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. पाळधी येथील शासकीय विश्रामगृह व गावात मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम झाले. यानिमित्त सकाळी आधुनिक फिरते नेत्रालयाचा शुभारंभ करण्यात आला. ही ॲम्ब्युलन्स आता थेट गावोगावी जाऊन नागरिकांची नेत्र तपासणी करणार आहे. तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येणार असून, ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील अत्याधुनिक रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. या उपक्रमासह गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिलचे वाटप, आरोग्य केंद्रात फळ, गरजूंना जेवण वाटप करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नशिराबाद नगरपरिषदेला मिळालेल्या आधुनिक अग्निशमन वाहनाचे लोकार्पण व पाळधी बु. ग्रामपंचायतीतर्फे गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडीचे लोकार्पण देखील करण्यात आले. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, सरपंच विजय पाटील, शरद कोळी, माजी सभापती सचिन पवार, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उपमहापौर मनोज चौधरी, श्याम कोगटा, उपनगराध्यक्ष विजय महाजन, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगराध्यक्ष पिंटू पाटील, शिवसेना, इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Source link
पाळधीत फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण, रक्तदान शिबिर:सेवा हेच खरे व्रत या भावनेतून उपक्रम