Headlines

पावसासाठी कुर्डुवाडीत मुस्लिम बांधवांनी मागितली दुआ‎:सहा नक्षत्रं कोरडी गेली, आता पूर्वा आणि उत्तरा या नक्षत्रांमध्ये पाऊस पडेल, अशी भाबडी आशा‎



संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह माढा तालुक्यात सप्टेंबर महिना उजाडला तरी वरुणराजाने दांडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर पावसाळी सहा नक्षत्रं पूर्णपणे कोरडी गेली. आता मदार केवळ फाल्गुन पूर्व आणि उत्तरा नक्षत्रावर आहे. या परतीच्या नक्षत्रांमध्ये

.

पावसाळ्यातील प्रमुख ९ नक्षत्रे आहेत. यामध्ये मृग नक्षत्र साधारण ८ जून ते २१ जून यापासून पावसाळा सुरू झाला तसा केवळ हलका पाऊस झाला. नंतर आर्द्रा नक्षत्र २२ जून ते ५ जुलै सगळ्यात जास्त पाऊस देणारे नक्षत्र म्हणून ओळखले जाते. परंतु वरुणराजा या कळवधीत पूर्ण नाराज झाला. पुढे पुनर्वसु नक्षत्र ६ जुलै ते १९ जुलै आणि पुष्य नक्षत्र २० जुलै ते २ ऑगस्ट मध्ये पावसाचा ठिपकादेखील पाहावयास मिळाला नाही.

आश्लेषा नक्षत्र ३ ते १६ ऑगस्ट आणि मघा नक्षत्र १७ ते ३० ऑगस्टदरम्यानचे नक्षत्रही कोरडे गेले. येणाऱ्या काळात पूर्वा फाल्गुनी ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरमध्ये दमदार पावसाची अपेक्षा होती. पण सोलापूर जिल्ह्याच्या पदरी पूर्ण निराशा दिसतेय. यापैकी आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा ही चार नक्षत्रे शेतीसाठी आणि चांगल्या पावसासाठी सर्वात महत्त्वाची मानली जातात. परंतु पूर्ण पणे पाऊस गायब झाल्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार पेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी पावसासाठी अल्लाहकडे सर्व जीवांसाठी विशेष दुआ मागितली. कुर्डुवाडी शहरातील ईदगाह मैदानावर शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या नमाजनंतर हाफिज मुस्ताक अहेमद रजा व हाफिज तौफिक रजा यांच्या मार्गदर्शनानुसार सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पांडे । जिल्ह्यासह करमाळा शहर व तालुक्यात सप्टेंबर उजाडला तरीही वरुणराजाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव आज शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता करमाळा टेंभुर्णी महामार्गावरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करणार आहेत. करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर शनिवारी दुपारी दिड वाजताच्या नमाज नंतर करमाळा शहरातील मुख्य धर्मगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली दुआ मागण्यात येणार आहे. मुस्लिम समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तरा अन् हस्तावर मदार परतीचा पाऊस उत्तरा फाल्गुनी १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर तसेच हस्त नक्षत्र २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाला तर उन्हाळा कडक जाणार हे नकीच. हस्तात पाऊस पडला तर शेतं भरून येतात, पण हस्त गेला की पावसाळा संपला असे मानतात. येणाऱ्या पावसावर मदार अवलंबून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *