Headlines

श्रीपूरमध्ये कर्मयोगी क्रीडा महोत्सवास प्रारंभ




श्रीपूर येथील कर्मयोगी श्री पांडुरंग कारखान्याच्या दोन दिवस चालणाऱ्या प्रशांत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अकलूजचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके व पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गत आठ वर्षांपासून दरवर्षी हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो . झेंडावंदन करून हा क्रीडा महोत्सव सुरू झाला. या वेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव मोरे, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, कर्मयोगी पांडुरंगाचे उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, कल्याण मंडळाचे अध्यक्ष सचिन विभूते आदी उपस्थित होते. या कारखान्याच्या वतीने आयोजित केलेला हा महोत्सव कामगारांना वर्षभर स्फूर्ती देणारा असतो. हा कारखाना राज्यात सर्वच बाबतीत नावलौकिक मिळवत आहे . कामगारांबाबतही येथील प्रशासन संवेदनशील असल्याचे संतोष वाळके व नीरज उबाळे यांनी यावेळी सांगितले. उमेश परिचारक यांनीही यावेळी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, आट्यापाट्या, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ अशा क्रीडा स्पर्धा कामगारांमध्ये आयोजित केल्या जातात .कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा हा दोन दिवसाचा क्रीडा महोत्सव साखर कामगारांना वर्षभराचे टॉनिक देऊन जातो . हे दोन दिवस तन-मन लावून खेळावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी यावेळी केले. पोलिसांपेक्षा साखर कामगार खेळाडू सरस या क्रीडा महोत्सवात आज अकलूज पोलिस ठाण्यातील पोलिस विरुद्ध कर्मयोगी पांडुरंग कारखान्यातील कामगारांमध्ये चुरशीचा क्रिकेट सामना झाला. या सामन्यासाठी पोलिस निरीक्षक नीरज उबाळे व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी हे संघांना प्रोत्साहन देत होते.अटीतटीच्या सामन्यात शेवटी कारखान्याच्या कामगार संघाने बाजी मारली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *