Headlines

पिंपरी चिंचवडमधील खड्डे दोन दिवसांत बुजवा:आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश; रस्ते, पदपथ, रेलिंग दुरुस्तीला प्राधान्य




पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिका प्रशासनाने दुरुस्ती कामांना गती दिली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंते यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतःहून आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करावी, असे निर्देश आहेत. खड्डे बुजवताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षितता याची विशेष दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. रस्त्यांसोबतच रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे आदेश आहेत. प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी संबंधित कामांचा नियमित आढावा घ्यावा. खड्डे दुरुस्ती तसेच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या कामांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज प्रगती तपासून त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *