Headlines

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई:गायत्री लाडू भांडारचा 1,188 किलो लाडू-बुंदीचा साठा जप्त, 1.73 लाखांचा साठा नष्ट; अन्न परवाना निलंबित




सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिठाई उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा बुद्रुक येथील टिळेकर नगरमधील मेसर्स गायत्री लाडू भांडार या मिठाई उत्पादन व साठा केंद्रावर धाड टाकून तब्बल 1 हजार 188 किलो मोतीचूर लाडू आणि बुंदीचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त अथवा अपमिश्रित असल्याचा संशय असलेला हा सुमारे 1 लाख 73 हजार 700 रुपयांचा साठा प्रशासनाने जागेवरच नष्ट केला. तसेच संबंधित उत्पादनाचा अन्न परवानाही तातडीने निलंबित करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी के. व्ही. बारवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुखराज नगादराम चौधरी (वय 50) यांच्या मालकीच्या गायत्री लाडू भांडार येथे तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 38 (सी) अंतर्गत संशयास्पद मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त साठा जागेवरच नष्ट यामध्ये 1 हजार 8 किलो मोतीचूर लाडू (किंमत 1 लाख 51 हजार 200 रुपये) आणि 180 किलो मोतीचूर बुंदी (किंमत 22 हजार 500 रुपये) यांचा समावेश आहे. एकूण 1 हजार 188 किलो साठ्याची किंमत 1 लाख 73 हजार 700 रुपये आहे. सणासुदीच्या काळात हा साठा बाजारात विक्रीसाठी जाऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण साठा नियमानुसार नष्ट करण्यात आला. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्नपदार्थांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जाचे रंग किंवा असुरक्षित घटक वापरणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ————— हेही वाचा.. शरद पवार रुग्णालयात दाखल: छातीत दुखत असल्याची तक्रार, प्रकृती स्थिर, मात्र रुग्णालयातच राहणार; 85 वर्षीय पवारांनी कर्करोगावरही केलीय मात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांना सोमवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेताना वाढणाऱ्या छातीतल्या वेदनांची त्यांनी तक्रार केली होती. ८५ वर्षीय पवार यांना खोकल्यानंतर रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आले. त्यांची कन्या, बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. सुळे यांच्या म्हणण्यानुसार, पवार यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व मापदंड स्थिर आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *