Headlines

Suraj Chavan Slams BJP Over Diya Mirza Pollution Video Controversy



मुंबई महानगरपालिकेच्या दिवाळी प्रदूषण जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून सुरू झालेल्या वादानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिया मिर्झा यांनी दिलेला सामाजिक संदेश हा सर्वांसाठीच आणि मुंबईच्या ह

.

सुरज चव्हाण म्हणाले की, मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हवा प्रदूषित शहर असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते. हवेचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे आणि दिया मिर्झा यांनी अगदी तसाच संदेश दिला होता. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांना कदाचित दिया मिर्झा यांच्या नावामुळे किंवा अडनावामुळे असे वाटले असावे की आपल्याला कोण सांगत आहे. परंतु, सामाजिक संदेश कोण देत आहे, यापेक्षा तो संदेश नेमका काय आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. दुर्दैवाने या साध्या गोष्टीला आता वेगळा धार्मिक रंग दिला जात आहे.

प्रदूषण रोखणाऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी

सुरज चव्हाण म्हणाले की, मुंबईमधील प्रदूषण रोखण्यासाठी आणि लोकांचे भविष्य चांगले राहून त्यांना शुद्ध हवा मिळावी यासाठी जो कोणी मैदानात उतरेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहील,” अशी ठाम भूमिकाही सुरज चव्हाण यांनी या वेळी मांडली.

महापौरांच्या भूमिकेवर राजकीय पडसाद

यापूर्वी भाजपचे आमदार अमित साटम यांच्या आक्षेपानंतर महापालिकेने दिया मिर्झा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला होता. त्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, दिग्दर्शक-अभिनेत्री दिया मिर्झा या नेहमी एका विशिष्ट अजेंड्यावरून काम करतात. हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवण्याचे धाडस त्यांनी करू नये. आम्ही त्यांना 100% ब्लॅकलिस्ट केले आहे, अशी आक्रमक भूमिका मांडली होती. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पूर्णपणे वेगळी असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे या वादावर वेगळा दृष्टिकोन समोर आणला आहे.

नेमका वाद काय?

मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या दिवाळी जनजागृती मोहिमेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नकोत, आमच्या परंपरा संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत, असा थेट हल्ला साटम यांनी चढवला. भाजपच्या या विरोधानंतर मुंबई महापालिकेने तातडीने नमते घेत दिया मिर्झाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केला. या कारवाईनंतर अभिनेत्री दिया मिर्झानेही कोई पैसा नही लिया है, भलाई का जमाना ही नहीं रहा अशी संतप्त पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिले आहे.

पालिकेची सेलिब्रिटी मोहीम वादात

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मुंबईतील वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने एक जनजागृती मोहीम हाती घेतली होती. नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, यासाठी महापालिकेने अनेक सिनेकलाकार आणि खेळाडूंचे छोटे जनजागृतीपर व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट केले होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.