Headlines

पुण्यात गाडी हटवण्यास सांगितल्याने तुंबळ हाणामारी:कोंढवा-फुरसुंगीमध्ये मारहाणीच्या दोन घटना, महिलांसह 7 जणांवर गुन्हे दाखल




वाहन लावण्यावरुन झालेल्या वादातून मारहाणीच्या घटना घडल्या. कोंढवा आणि फुरसुंगी भागात या घटना घडल्या. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलासंह सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोंढवा भागात घरासमोर लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने दाम्पत्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत संतोष वामन बरेकर (वय 41, रा. संत ज्ञानेश्वरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील संत ज्ञानेश्वरनगर परिसरात बरेकर कुटुंबीय राहायला आहे. आरोपी याच परिसरात राहायला आहेत. एका आरोपीने तक्रारदार यांच्या घरासमोर दुचाकी लावली होती. बरेकर यांनी त्याला दुचाकी काढण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपी बरेकर आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आरोपींनी तक्रारदार बरेकर यांना बांबूने मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक मासाळ तपास करत आहेत. हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची भागात वाहन लावण्याच्या वादातून दोघांना मारहाण करुन मोटारीची काच फोडण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत योगेश अमृतराव देशमुख (वय 38, रा. शिवरत्नसृष्टी सोसायटी, उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,एकाच कुटुंबातील एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख आणि आरोपी हे एकाच सोसायटीत राहायला आहेत. रस्त्याच्या कडेला मोटार लावण्यावरुन झालेल्या वादातून आरोपींनी तक्रारदार देशमुख आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. तक्रारदाराच्या मोटारीची काच आरोपींनी फोडली. पोलिस हवालदार एन लोणकर पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *