Headlines

पुण्यात गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेला अटक:बिबवेवाडी पोलिसांकडून कारवाई, विषारी दारू जप्त




बिबवेवाडी पोलिसांनी गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली असून, या दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थ मिसळल्याचे उघड झाले आहे. शीतल सुरेंद्र राठोड (वय 26, रा. कंजारभाट वस्ती, गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई राहुल खाडे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल राठोड ही गंगाधाम रस्त्यावरील मोकळ्या जागेत गावठी दारूची (हातभट्टी) विक्री करत असल्याची गुप्त माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. या दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थ मिसळले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एन. भुवड करत आहेत. तरुणाचा मोबाइल हिसकाविला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील आहे. सध्या तो लोकमान्यनगर परिसरात राहायला आहे. 1 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास तो सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलिसांनी ज्ञानप्रबोधिनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिस हवालदार एस शेंडजाळे पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *