![]()
पुण्यात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. कोथरूडमधील केळेवाडी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य उर्फ सनी राजू गाडे (वय 21, रा. केळेवाडी, कोथरूड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुलसिंग टाक, अनिलसिंग टाक, पिंटूसिंग दुधाणी, सुखासिंग दुधाणी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री आदित्य गाडे (वय 19) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे यांच्या नात्यातील एका तरुणीला आरोपी राहुलसिंग टाक याने पळवून नेले होते. यावरून गाडे आणि त्याच्या साथीदारांनी यापूर्वी सांगली जिल्ह्यातील आष्टा परिसरात राहुलसिंग टाक याच्यावर शस्त्राने हल्ला केला होता. याच पूर्ववैमनस्यातून त्यांच्यात वाद सुरू होते. 3 मे रोजी रात्री आदित्य हा कोथरूडमधील केळेवाडी परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्यांनी शिवीगाळ करत आदित्यवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कोथरूड विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. फरार आरोपींचा शोध सुरू असून, सहायक पोलिस निरीक्षक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पूर्ववैमनस्यातून तरुणाला सिंमेटच्या गट्टूने मारहाण पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. हडपसरमधील काळेपडळ परिसरात ही घटना घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश संजू बिरादार (वय 25, रा. ससाणेनगर, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दुर्वांग मानकर, साहिल शेलार (दोघे रा. ससाणेनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बिरादार याची पत्नी अपेक्षा हिने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बिरादार याची तीन महिन्यांपूर्वी आरोपींशी भांडणे झाले होते. वादातून आरोपी आणि साथीदारांनी हडपसरमधील ससाणेनगर परिसरात गणेशला शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. पोलिस उपनिरीक्षक एस राऊत पुढील तपास करत आहेत.
Source link
पुण्यात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार:खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल