Headlines

पुण्यात ‘डीजे’चे वाढलेले स्तोम कमी होताना लवकरच दिसेल- फडणवीस:बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत विचारांविषयी दिला उपरोधिक सल्ला




गणेशोत्सवात ‘डीजे’च्या आवाजाविरुद्ध पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी अतिशय शुद्ध मराठी भाषेतील शब्द वापरत मोहीम हाती घेतली. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याने वातावरण तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या हल्ल्याचा निषेध केला. पुण्यात डीजेचे स्तोम माजले आहे. ते लवकरच कमी होताना किंवा कायमचे बंद होताना दिसेल, असे ते म्हणाले. बापट यांच्या भाषेची शुद्धता चांगली असली तरी विचार मांडताना इतर नागरिकांच्या भावना आणि सण-उत्सवाचे महत्त्वही लक्षात घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, बापट यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात रविवारी सामाजिक संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याविषयी बापट म्हणाले की, जिवंत राहिलो तर मी मोर्चात जाणार आहे. शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे मोहिमेत राजकारण वाढणार डीजेविरोधी मोहीम पर्यावरणप्रेमी नागरिक आणि काही सामाजिक संघटनांपुरती मर्यादित होती. मात्र, शुक्रवारी शरद पवारांनी बापटांच्या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यामुळे या मोहिमेत पुढील काळात राजकारण वाढण्याची चिन्हे आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *