Headlines

पुण्यात दोन घरांतून दागिने, रोकड आणि साहित्य चोरीला:नऱ्हेतील फ्लॅटमध्ये डुप्लिकेट चावीने प्रवेश; बोपोडीत कुलूप तोडले, दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल




पुण्यातील नऱ्हे आणि बोपोडी येथे घरफोडीच्या दोन घटना घडल्या. नऱ्हेतील फ्लॅटमधून सोन्याचे दागिने, तर बोपोडीतील घरातून रोकड आणि साहित्य चोरीला गेले. दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. नऱ्हे येथील व्यंकटेश हाइट्समध्ये राहणारे शरद अशोक टोणे (वय २७) यांनी याबाबत फिर्याद दिली. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० दरम्यान ही घटना घडली. घराला कुलूप असताना चोरट्याने डुप्लिकेट चावीने प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उघडून त्यातील तिजोरीतले सोन्याचे दागिने चोरले. दागिन्यांची किंमत फिर्यादीने नमूद केलेली नाही. नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, परिसरातील संशयास्पद हालचालींची तपासणी सुरू आहे. दुसरी घटना बोपोडीतील कुंदन कुशल सोसायटीसमोरील दीपाली अपार्टमेंटमध्ये घडली. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ दरम्यान चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि रोकड व साहित्य चोरले. दीपाली अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक २, भाऊ पाटील रोड येथे राहणारे तिलक किशोर घागर (वय ३२) यांनी फिर्याद दिली. खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तडीपार गुंडावर नियम उल्लंघन प्रकरणी गुन्हा दरम्यान, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला अल्ताफ मोहम्मद शेख (वय २४, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) परिसरात आढळला. त्याच्याकडे लोखंडी शस्त्रही होते. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास गल्ली क्रमांक ३, पाटील इस्टेट, शिवाजीनगर येथे हा प्रकार घडला. सुधाकर सखाराम राठोड (वय ३३, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली. तडीपारीचा आदेश लागू असतानाही अल्ताफ परिसरात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *