Headlines

पुण्यात प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून तरुणीवर चौघांकडून बलात्‍कार:वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा, चौघांना अटक




प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका २० वर्षीय तरुणीवर मुख्य आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याच्या आणखी ३ मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार करण्यास पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता पीडितेचे अश्लील व्हिडिओ चित्रित करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध लैगिक, धमकी आणि अन्य गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे. फरहान रिझवान शेख (२०), फजल शेख (२०), रेहान रिझवान शेख (१८) आणि साहिल (२०, सर्व रा. विमाननगर) यांच्‍यावर या प्रकरणी बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. फरहानने लग्नाचे आमिष देत ओढले जाळ्यात तरुणीची ओळख फरहान रिझवान शेख याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. या नात्याचा गैरफायदा घेत फरहानने लग्नाचे व प्रेमाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ ते ३ जून २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *