Headlines

पुण्यात 26 नोव्हेंबरला सांस्कृतिक महोत्सव:बालगंधर्व रंगमंदिरात परिसंवाद, जीवनगौरव पुरस्कार आणि ‘द्विशताब्दी क्रांतीसूर्याची, गाथा संविधानाची’ महाजलसा




भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्ष आणि महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त २६ नोव्हेंबरला पुण्यात सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी २ ते रात्री १० या वेळेत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सम्यक साहित्य संमेलन यांच्या वतीने हा महोत्सव होणार आहे. समितीचे अध्यक्ष आणि पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. समितीचे सचिव दीपक म्हस्के यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले यांचा सामाजिक समतेचा विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानातील योगदान आणि चवदार तळे सत्याग्रहाचा सामाजिक न्यायाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. दुपारी २ वाजता गायक अशोक गायकवाड यांच्या ‘आम्ही संविधानाचे लोक… एक संगीतमय जागृती’ या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात होईल. दुपारी ४ वाजता ‘महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य आणि भारतीय संविधानातील समता व सामाजिक न्यायाचे प्रेरक स्रोत’ या विषयावर परिसंवाद होईल. ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. निवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे आणि विचारवंत मिलिंद टिपणीस सहभागी होतील. सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि महाड सत्याग्रहातील योगदानाबद्दल सुरेंद्रनाथ टिपणीस यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिले जातील. पुरस्कारात महात्मा फुले पगडी, सन्मानपत्र आणि ५१ हजार रुपये असतील. डॉ. आढाव यांच्या पत्नी डॉ. शिलाताई आढाव पुरस्कार स्वीकारतील. सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या वतीने मिलिंद टिपणीस पुरस्कार स्वीकारतील. सायंकाळी ६ वाजता ‘द्विशताब्दी क्रांतीसूर्याची, गाथा संविधानाची’ हा महाजलसा होईल. अंजली गडपायले, नागसेन सावदेकर, शिरीष पवार यांच्यासह विविध कलाकार यात सहभागी होतील. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाडेकर यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *